मधमाशापालन योजनेसाठी अर्ज करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:20 AM2021-07-08T04:20:28+5:302021-07-08T04:20:28+5:30
मधमाशापालनामध्ये तीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वैयक्तिक मधपाळ, केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ आणि केंद्रचालक संस्थेचा समावेश करण्यात आला ...
मधमाशापालनामध्ये तीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वैयक्तिक मधपाळ, केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ आणि केंद्रचालक संस्थेचा समावेश करण्यात आला आहे. वैयक्तिक मधपाळ या घटकासाठी अर्जदार हा साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास त्यास प्राधान्य दिले जाईल. केंद्रचालक प्रगतिशील आणि वैयक्तिक केंद्रचालक या घटकासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था घटकासाठी संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे मालकीची किंवा दहा वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतलेली किमान एक एकर शेतजमीन असायला पाहिजे. संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्त्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट इमारत असणे आवश्यक आहे, असेही म्हटले आहे.
लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासाठी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणेही अनिवार्य राहील. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.