हिंगोलीतील सहा कामांना मंजुरी-बांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:51 PM2018-01-02T23:51:58+5:302018-01-02T23:52:12+5:30

नगरपालिकेच्या सहा महत्त्वाकांक्षी कामांना नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या पुढाकाराने तांत्रिक मान्यता मिळाली असून लवकरच या कामांच्या निविदा निघणार असल्याचे पालिकेतून सांगण्यात आले. यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आधीच २५ कोटींची घोषणा केली होती.

Approval for six works from Hingoli | हिंगोलीतील सहा कामांना मंजुरी-बांगर

हिंगोलीतील सहा कामांना मंजुरी-बांगर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नगरपालिकेच्या सहा महत्त्वाकांक्षी कामांना नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या पुढाकाराने तांत्रिक मान्यता मिळाली असून लवकरच या कामांच्या निविदा निघणार असल्याचे पालिकेतून सांगण्यात आले. यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आधीच २५ कोटींची घोषणा केली होती.
अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी हिंगोलीला २५ कोटी रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यात पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत, नाट्यगृह, शिवाजीराव देशमुख सभागृह, शेतकरी भवन, जलतरणिका, कयाधू नदीलगत स्मशानभूमीचे सुशोभीकरण ही कामे प्रस्तावित करण्यात आली होती. या कामांना या विशेष निधीतून तांत्रिक मान्यता दिली आहे.
हिंगोलीतील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या बाबी आहेत. शिवाजीराव देशमुख सभागृह व इंदिरा खुले नाट्यगृहाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. एनटीसीत जलतरणिका तर मंगळवारा भागात शेतकी भवन उभारले जाणार आहे. यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे, आ.तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी रामदास पाटील व सर्व गटनेते, नगरसेवकांनी प्रयत्न केले.

Web Title: Approval for six works from Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.