रुग्णालयाला दोन उपकेंद्रांवरून वीजपुरवठ्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:22 AM2021-05-28T04:22:46+5:302021-05-28T04:22:46+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयात ३३ के.व्ही उपकेंद्र खटकाळी येथून निघणार ११ केव्ही हॉस्पिटल वाहिनीवरून वीजपुरवठा करण्यात येत आहे. ११ ...

Arrangement of power supply to the hospital from two sub-stations | रुग्णालयाला दोन उपकेंद्रांवरून वीजपुरवठ्याची व्यवस्था

रुग्णालयाला दोन उपकेंद्रांवरून वीजपुरवठ्याची व्यवस्था

Next

जिल्हा सामान्य रुग्णालयात ३३ के.व्ही उपकेंद्र खटकाळी येथून निघणार ११ केव्ही हॉस्पिटल वाहिनीवरून वीजपुरवठा करण्यात येत आहे. ११ केव्ही हॉस्पिटल फिडर व ३३ केव्ही फिडर खटकाळी लाईनला लागत असलेल्या झाडांच्या फांद्या गेल्या काही दिवसांपासून तोडण्यात येत आहेत तसेच विनाकारण वीजपुरवठा खंडित होऊ नये, याची दक्षता ‘महावितरण’तर्फे घेण्यात येत आहे. तांत्रिक अडचणींमुळे ३३ केव्ही खटकाळी उपकेंद्रावरून वीजपुरवठा करण्यास अडचण आल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयाकरिता ३३ केव्ही उपकेंद्र यशवंतनगरवरील टाऊन २ फीडरवरून वीजपुरवठा करण्यासाठी ११ केव्ही एबी स्वीचची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित होणार नाही, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांनी दिली.

Web Title: Arrangement of power supply to the hospital from two sub-stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.