बाहुबली भगवंताच्या पाषाण मूर्ती स्वागताचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:34 AM2021-01-16T04:34:33+5:302021-01-16T04:34:33+5:30
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील दिगंबर जैन तीर्थक्षेत्र, पुसेेगाव येथे १७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता भगवान बाहुबली मूर्तीचे ३१ ...
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील दिगंबर जैन तीर्थक्षेत्र, पुसेेगाव येथे १७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता भगवान बाहुबली मूर्तीचे ३१ फुटी अखंड पाषाण येणार असून, त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सकल जैन समाज व गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
राष्ट्रसंत आचार्य विरागसागर महाराजांचे शिष्य प. पू. विषेशसागर महाराजांच्या सानिध्यात मूर्तीचे निर्माण कार्य जैन सांस्कृतिक भवनच्या प्रांगणात होणार आहे. राजस्थानमधील बिजोरीया जिल्ह्यातील ११ मूर्तिकार मूर्ती घडविण्याचे काम करणार आहेत. हे मूर्ती पाषाण रिसोड, पानकनेरगाव, सेनगावमार्गे पुसेगाव येथे १७ जानेवारी रोजी येणार आहे. यासोबत प. पू. मुनीश्री विशेषसागर महाराजांचा संघ असणार आहे. २०२० साली महाराजांचा चार्तुमास याचठिकाणी होऊन पुसेगाव येथील भाविकांनी त्याचा लाभ घेतला. यासाठी सकल जैन समाज, हिंगोली तसेच पुसेगाव येथील जैन समाजाने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे ही ३१ फुटाची भगवान बाहुबली भगवंताची मूर्ती ही महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती असणार आहे. या कार्यक्रमाला सकल जैन समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मूर्ती निर्माण समितीचे अध्यक्ष राजेंद्र जैन, कैलास भुरे, रवी जैन व सकल जैन समाज, पुसेगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
फाेटाे नं. ०३