मूगाची आवक वाढली; भाव मात्र कवडीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:52 AM2018-08-27T00:52:45+5:302018-08-27T00:53:24+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये रविवारच्या आठवडी बाजारात नविन मूगाची आवक मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र आतीवृष्टीमुळे डागेल मूगाला दोन हजार तर चांगल्या मूगाला साडेचार हजार प्रती क्विंटल पर्यंत भाव मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये रविवारच्या आठवडी बाजारात नविन मूगाची आवक मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र आतीवृष्टीमुळे डागेल मूगाला दोन हजार तर चांगल्या मूगाला साडेचार हजार प्रती क्विंटल पर्यंत भाव मिळाला.
यावर्षीच्या खरिप हंगामामध्ये या परिसरात मूगाचे क्षेत्र जास्त प्रमाणावर होते. जून महिन्यामध्ये दमदार पाऊस पडल्यामुळे या वर्षी मूगगाचे पीक जोमदार आले.
मात्र आठवड्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे हाती आलेल्या मुगाला अत्यल्प भाव मिळत होता. तर चांगल्या प्रतीच्या मुगाला साडेचार हजारापर्यंत भाव मिळाला.
आधीच उत्पन्न कमी आणि बाजारात भाव मिळत नसल्यामूळे शेतकरी हैराण झाला आहे. याच आठवडी बाजारात मुगासह गहू दोन हजार रुपये प्रती क्विंटल तर हळद साडे सहा हजार रुपये प्रती क्विंटल भावाने विक्री झाली. हळदीची आवक मात्र अल्प प्रमाणात होती.