संत गजानन महाराज पालखीचे मराठवाड्यात आगमन, हजारो भाविकांनी घेतले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2023 03:49 PM2023-06-05T15:49:18+5:302023-06-05T15:57:49+5:30
उन्हाचा पारा वाढला असला तरी भाविकांची संख्या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले
सेनगाव (जि. हिंगोली): संत गजानन महाराज यांची पालखीचे (पायी दिंडी) सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे आज सकाळी साडे नऊ वाजेदरम्यान आगमन झाले. यानंतर दुपारी साडेबारा वाजेदरम्यान ही पालखी सेनगाव शहराकडे मार्गस्थ झाली. सेनगाव येथे सोमवारी मुक्काम राहणार आहे.
शेगाव येथील संत गजानन महाराज पालखीचे हे ५४ वे वर्ष आहे. कोरोनाकाळ सोडला तर एकदाही या पालखीला खंड पडला नाही. उन्हाचा पारा वाढला असला तरी भाविकांची संख्या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले दिसत आहे. ५ जून रोजी पानकनेरगाव येथे गावकऱ्यांनी महाराजांच्या पालखीचे स्वागत केल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यानंतर दुपारी साडेबारा वाजेदरम्यान पालखी सेनगावकडे मार्गस्थ झाली.