हिंगोलीत हळदीची आवक वाढली; वाहनांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:44 AM2020-06-22T11:44:31+5:302020-06-22T11:45:23+5:30
जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हिंगोली येथील संत नामदेव कॉटन मार्केट यार्डमध्ये आज मोठ्या प्रमाणावर हळद विक्रीसाठी आणली आहे.
हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आज पहाटेपासून हळद घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आज हळदीची मोठी आवक वाढली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हिंगोली येथील संत नामदेव कॉटन मार्केट यार्डमध्ये आज मोठ्या प्रमाणावर हळद विक्रीसाठी आणली आहे. अंदाजे हळदीची आवक सहा ते सात हजार पोत्यांची अशू शकते.
सध्या शेतकऱ्यांना शेतातील कामासाठी पैशाची गरज असल्यामूळे हळद माल विक्रिसाठी आणला आहे. हळदीचा लिलाव हा बारा वाजता सुरू करण्यात येणार आहे. हळदीला ४८००ते ५९०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. जर आजच्या दिवसात पावसाने हजेरी लावली तर मार्केट यार्डमध्ये विक्रिसाठी आणलेली हळद पावसाच्या पाण्याने भिजू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोबतच ताडपत्री आणल्याचे दिसुन आले.