माझी वसुंधरा अभियानात आशा वर्करचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:29 AM2020-12-31T04:29:19+5:302020-12-31T04:29:19+5:30

हिंगोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१, माझी वसुंधरा अभियानात शहरातील आशा ...

Asha Worker's participation in my Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियानात आशा वर्करचा सहभाग

माझी वसुंधरा अभियानात आशा वर्करचा सहभाग

Next

हिंगोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१, माझी वसुंधरा अभियानात शहरातील आशा वर्कर यांनी सहभाग नोंदवला आहे. ३० डिसेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आशा वर्कर, सुपर वायझर, नसरीम मॅडम यांची उपस्थिती हाेती. या अभियानातील स्वच्छता व पृथ्वी, वायू, अग्नि, जल आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वासोबत मानवी जीवनपद्धती अंगीकारण्याची सवय लागावी, जैवविविधतेचे अस्तित्व टिकवून ठेवणे, पर्यावरण, वातावरणातील बदलांनुसार घडणाऱ्या घटनांचे परिणाम सहन करण्याची सवय निर्माण व्हावी, यासाठी शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्याचा मार्ग ‘माझी वसुंधरा’ या अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर माहिती कार्यशाळेत सांगण्यात आली.

या कार्यशाळेत अनिता चोंडेकर, सविता इंगेळे, अनिता खंदारे, संगीता खंदारे, सुवर्णा डोंगरे, सुनीता गायकवाड, मोहिनी वाढे, आशा शिंदे, निषाद पठाण, शकुंतला कुटे, रेखा हराळ, सोनी वाघमारे, सरस्वती बांगर, छाया भारती, सीमा सरकटे, प्रज्ञा इंगोले, सपना रणवीर, शीतल दुधडकर, कविता खंदारे, सुमित्रा शिखरे, रीना दाभाडे, उर्मिला कीर्तनकार, वैशाली काशीदे ईत्यादी आशा वर्कर व नगर परिषदचे कनिष्ट अभियंता सनोबर तसनीम, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, मुंजाजी बांगर, गजानन बांगर, प्रदीप आंधळे, गणेश ठोके, सुमित कांबळे , अजय मंडले , करण पउळकर, शक्ती कांबळे. आकाश गायकवाड, मनीष दराडे, गणेश बांगर, सागर गडप्पा यांची उपस्थिती हाेती. फाेटाे नं. १०

Web Title: Asha Worker's participation in my Vasundhara Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.