महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:58 PM2018-10-28T23:58:24+5:302018-10-28T23:58:37+5:30

गौण खनिजाची चोरटी वाहतूक रोखणाऱ्या गस्ती पथकातील तलाठ्यावर अवैध वाळू वाहतूक करणाºयांनी कोयते व लाकडी दंडुके घेऊन प्राणघातक हल्ला करून पसार झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास औंढा तालुक्यातील गोळेगाव येथे घडली. यात तलाठी विठ्ठल शेळके हे जखमी झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Assault on Revenue Squad | महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला

महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : गौण खनिजाची चोरटी वाहतूक रोखणाऱ्या गस्ती पथकातील तलाठ्यावर अवैध वाळू वाहतूक करणाºयांनी कोयते व लाकडी दंडुके घेऊन प्राणघातक हल्ला करून पसार झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास औंढा तालुक्यातील गोळेगाव येथे घडली. यात तलाठी विठ्ठल शेळके हे जखमी झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील वाळू घाटांचा मागच्याच आठवड्यात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आढावा घेऊन चोरटी अवैध वाळू उपसा वाहतुकीवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयांतर्गत अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागातर्फे विशेष गस्ती पथक तयार करण्यात आले. २६ आॅक्टोबर रोजी रात्री १२ च्या दरम्यान सदर पथक गस्तीवर असतांना जिंतूर रोडवरील गोळेगाव येथे एम.एच. ३८ डी. ३३७७ या क्रमांकाचे टिप्पर शासनाचे महसूल बुडवून अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना मिळाली. त्यांनी पोलीस सोबत घेऊन टिप्परचा पाठलाग केला. यावेळी पथकातील तलाठी विठ्ठल शेळके यांनी टिप्पर रोखण्याचा प्रयत्न केला असता अवैध वाळू वाहतूक करणारे आरोपी राहुल घुगे, सचिन शेषेराव बांगर व इतर दहा ते बारा जणांनी तलाठ्यावर प्राणघातक हल्ला करून मारहाण करीत टिप्परसहित पसार झाले. मारहाणीत तलाठी शेळके जखमी झाले असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. याप्रकरणी विठ्ठल शेळके यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांवर लाकडी दांडा, कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच शासनाचा महसूल बुडवून गौण खनिजाची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी राहुल घुगे, सचिन बांगर व इतर दहा ते बारा जणांवर गौनखनिज कायदा १९७७ महसूल अधिनियम व भादंविनुसार विविध कलमान्वये औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तपास पोनि कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल तायडे, अफसर पठाण हे करीत आहेत.

Web Title:  Assault on Revenue Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.