आश्वासन ठरले फोल; कुणी गावात ढुंकूनही पाहिले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:13 PM2019-05-10T23:13:56+5:302019-05-10T23:14:23+5:30
कळमनुरी तालुक्यातील उमरा व शिवणी खु. येथे सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळी दौऱ्यात पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी या गावांना भेटी दिल्या. उमºयात तर रेशन पुरवठा होत नसल्याचे गा-हाणे मांडले. कांबळे यांनी गुरुवारी सकाळी १० वाजता उमºयाला धान्य देण्याचे अधिकाऱ्यांना आदेशित केले. मात्र गावात कुणीच फिरकलेही नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील उमरा व शिवणी खु. येथे सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळी दौऱ्यात पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी या गावांना भेटी दिल्या. उमºयात तर रेशन पुरवठा होत नसल्याचे गा-हाणे मांडले. कांबळे यांनी गुरुवारी सकाळी १० वाजता उमºयाला धान्य देण्याचे अधिकाऱ्यांना आदेशित केले. मात्र गावात कुणीच फिरकलेही नाही.
कळमनुरी तालुक्यातील शिवणी खुर्द, रामवाडी, उमरा या दुष्काळी गावांना पालकमंत्र्यांनी बुधवारी भेटी दिल्या. ग्रामस्थांच्या प्रत्येक समस्येवर त्यांनी अश्वासने दिली. मात्र प्रशासनाने त्यावर अंमल केलाच नाही. उमरा येथे तर दुसºया दिवशी सकाळीच धान्य वाटप करण्याची हमी दिली होती. मात्र दुसºया दिवशी दुपारनंतरही या गावाला धान्य मिळाले नसल्याचे दिसून आले. गुरुवारी दुपारी १ वाजता ग्रा.पं.च्या पाणीपुरवठा करणाºया टाकीजवळ भरउन्हात महिलांनी पाण्यासाठी गर्दी केली होती. पाण्यासाठी महिलांमध्ये वादही होत होते. हंडाभर पाण्यासाठी जवळपास २० ते २५ महिला सकाळपासून उन्हात उभ्या असल्याचे सांगत होत्या. तीन महिन्यांपासून एका बोअरवर सर्व गावाला तहान भागवावी लागत आहे. ग्रा.पं. पाणीटंचाईसाठी उपाययोजना राबवित नसल्याचा आरोप प्रयागबाई दिंडे यांनी केला.
ग्रा.पं.ने एक बोअर अधिग्रहित केला आहे. त्याला सध्या एक ते दीड तासच पाणी येते. त्यावर ५५० ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. टँकरसाठी अजून प्रस्ताव पाठविला नसल्याचे सरपंच उषाताई शेकुराव दिंडे यांनी सांगितले.
बुधवारी उमरा या गावाला भेट दिली असता ग्रामसेवक केंद्रे हे ग्रा.पं.मध्ये हजर नव्हते. नंतर बीडीओ मनोहर खिल्लारी यांच्या फोनवरून त्यांच्याशी बोलणे झाले. ग्रामस्थही त्यांचा फोन बंद असतो, असेच सांगत होते.
उमरा या गावाला तीन महिन्यांपासून रेशन मिळाले नसल्याची तक्रार महिलांनी केली. रेशन वाटप बायोमॅट्रिकवर झाल्यापासून बोटाचे ठसे मशिन स्वीकारत नसल्याने लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. रेशन दुकानदार धान्य दिल्यानंतर बायोमेट्रिक मशिनमधून आलेल्या पावत्या लाभार्थ्यांना न देता फाडून टाकत असल्याचा आरोप वनिता कानबाराव कांबळे यांनी केला.
दरम्यान, शिवणी खु. येथे कालच टँकरच्या दोन फेºया सुरू झाल्या. मात्र शुद्ध पाण्याचे स्वतंत्र टँकर आले नाही. यावरून ग्रामस्थांत आज पुन्हा ओरड सुरू असल्याचे दिसले.
पालकमंत्री म्हणाले तहसीलदारांना पुन्हा सूचना
उमरा या गावाला धान्य मिळत नसल्याने प्रशासनाला दुसºयाच दिवशी ते देण्यास सांगितले होते. मात्र तांत्रिक अडचण आहे. ती दूर होताच दोन दिवसांत धान्य वाटप करता येईल असे तहसीलदारांनी सांगितल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.
शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत विचारले असता त्याबाबतही प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्याचेही नियोजन तत्काळ होणे शक्य नाही. नगरपालिका किंवा एखाद्या मोठ्या योजनेवरून हे करावे लागेल. त्याची चाचपणी सुरू असल्याचेही ते म्हणाले.
शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी पालकमंत्र्यांनी उपविभागीय अधिकाºयांना सूचना केली होती. याबाबत उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांना विचारले असता यासाठी कळमनुरी नगरपालिकेला पत्र दिले. तर पाणी आरक्षण व इतर बाबींसाठी वरिष्ठांकडे हा प्रश्न मांडणार असल्याचे ते म्हणाले.
लोकसंख्येच्या तुलनेत अधिग्रहित केलेल्या बोअरचे पाणी लोकसंख्येच्या तुलनेत गावासाठी मुबलक आहे. त्यामुळे टँकरचा प्रस्ताव पाठविला नाही. आता टँकरचा प्रस्ताव पाठविणार आहे.
- डी,.एन. केंद्रे,
ग्रामसेवक, उमरा