राज्यपालांच्या दौऱ्यापूर्वी हिंगोलीत एटीएम मशीन पळवले; ४३ लाखांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 11:02 AM2021-08-06T11:02:20+5:302021-08-06T11:04:09+5:30

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एटीएमजवळ टेम्पो लावून एटीएम मशीन उचलून नेले

ATM machines stolen in Hingoli before Governor's visit; 43 lakh cash looted | राज्यपालांच्या दौऱ्यापूर्वी हिंगोलीत एटीएम मशीन पळवले; ४३ लाखांची रोकड लंपास

राज्यपालांच्या दौऱ्यापूर्वी हिंगोलीत एटीएम मशीन पळवले; ४३ लाखांची रोकड लंपास

Next

शिरड शहापूर ( हिंगोली ) : औंढा वसमत या मार्गावर शिरड शहापूर येथे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी पळविल्याची घटना 6 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली. एटीएम मशीनमध्ये पूर्वी 38 लाख रुपये होते तर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पुन्हा 5 लाख असे एकूण 43 लाख रुपये असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिरड शहापूर ते गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. येथे मोठा व्यापारी वर्ग आहे. एटीएमचा वापर करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मशीनमध्ये अंदाजे वीस लाख रुपये टाकण्यात आले होते. चोरट्यांनी पाळत ठेवून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एटीएमजवळ टेम्पो लावून एटीएम मशीन उचलून नेल्याची घटना घडली. माहिती मिळताच कुरुंदाचे सपनी सुनील गोपी नवार, फौजदार सविता बोधनकर, गुन्हे अन्वेषण विभागाचे उदयन खंडेराय आदींनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांच्या शोधासाठी नाका-बंदीचे आदेश दिले. तसेच परिसरात तपासणी सुरू केली असता शिरडपासून जवळ असलेल्या वाघी पाटीजवळ एटीएम मशीन वरील फायबरचे कव्हर रस्त्यावर फेकून दिलेले आढळले. यापूर्वी हेच एटीएम पळवून नेण्याचा प्रकार घडला होता. औंढा वसमत या राज्य रस्त्यावर नेहमीच असे प्रकार घडत आहे.

Web Title: ATM machines stolen in Hingoli before Governor's visit; 43 lakh cash looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.