रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:50 IST2018-07-29T00:49:33+5:302018-07-29T00:50:00+5:30
येथील रेल्वेस्थानक परिसरात अकोलामार्गे जाणाऱ्या काचीगुडा एक्सप्रेस रेल्वेसमोर उडी घेऊन एका मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना २८ जुलै रोजी ४ वाजेच्या सुमारास घडली. मुलीच्या डोक्यास गंभीर मार लागला असून तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील रेल्वेस्थानक परिसरात अकोलामार्गे जाणाऱ्या काचीगुडा एक्सप्रेस रेल्वेसमोर उडी घेऊन एका मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना २८ जुलै रोजी ४ वाजेच्या सुमारास घडली. मुलीच्या डोक्यास गंभीर मार लागला असून तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हिंगोली रेल्वेस्थानक परिसरात शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पूजा गयबाजी रणवीर (१७) रा. रिसाला बाजार हिंगोली या मुलीने अचानक काचीगुडा एक्सप्रेससमोर उडी मारली. उडी मारताच रेल्वेची मुलीला जोराची धडक लागली अन् ती बाजूला फेकल्या गेली. मुलीच्या डोक्याला गंभीर मार लागला असून ती बेशुद्ध पडल्याची माहिती जीआरपी गणेश जाधव यांनी दिली. जखमी मुलीस उपचारासाठी तत्काळ हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात जाधव यांनी हलविले. जखमी मुलीवर उपचार सुरू आहेत. परंतु पूजाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न का? केला हे मात्र समजू शकले नाही. शुद्धीवर आल्यानंतर जखमी मुलीचे बयाण घेण्यात येणार आहे.