नेत्यांच्या गावाकडे लागले तालुक्याचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:25 AM2021-01-17T04:25:57+5:302021-01-17T04:25:57+5:30

सोमवारी निकाल जाहीर होणार असून, कोणता गाव नेत्याच्या बाजूने की त्याच्या विरोधात, याचे गणित निकालातून स्पष्ट होणार आहे. ...

The attention of the taluka turned to the village of the leader | नेत्यांच्या गावाकडे लागले तालुक्याचे लक्ष

नेत्यांच्या गावाकडे लागले तालुक्याचे लक्ष

Next

सोमवारी निकाल जाहीर होणार असून, कोणता गाव नेत्याच्या बाजूने की त्याच्या विरोधात, याचे गणित निकालातून स्पष्ट होणार आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, आंबाचोडी, पारडी खुर्द, डोनवाडा ही नेत्यांची गावे म्हणून ओळखली जातात. या गावावर नेत्यांचे वर्चस्व राहिलेले दिसते. त्यामुळे अनेक नेते रिंगणातही आहेत. तेही नशीब आजमावत आहेत. आपापल्या गावावर प्रत्येक नेता वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करताना दिसले.

कुरुंदा येथे वाॅर्ड क्रमांक ६ मधील एका जागेसाठी लढत झाली. यामध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे बिनविरोध १६ जागा झाल्या, तरी एक जागा लक्षवेधी लढतीची ठेरली. गिरगाव येथेही अनेक नेत्यांनी निवडणूक रिंगणात उतरून वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्वशक्ती पणाला लावली आहे. आंबाचोंडी हे नेत्याचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात चांगलीच लढत झाली, तर पांगारा शिंदे येथेही वर्चस्वाची लढाई झाली. डोनवाडा येथे बाजार समितीचे उपसभापती स्वतः रिंगणात असल्याने, या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. पारडी खुर्द हे गाव भाजप तालुकाध्यक्षांचे असून, त्यांचे पॅनल होते. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष यांचे होते. अत्यंत चुरशीची लढत या दोन्ही पॅनलमध्ये झाली. या भागात अनेक गावे नेत्यांचे असल्याने, हे नेते ग्रां. पं. निवडणुकीत वर्चस्व सिद्ध करून तालुक्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करतात. त्यामुळे नेत्यांच्या गावातील निकालाकडे तालुक्याचे लक्ष वेधलेले आहे.

(नोट- कृपया बातमी पुन्हा एकदा पाहून घेणे, वाक्यांची लिंक नीट लागत नव्हती.)

Web Title: The attention of the taluka turned to the village of the leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.