जवळा पांचाळ येथे वानरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:47 AM2018-09-14T00:47:49+5:302018-09-14T00:48:06+5:30
कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे सगळीकडेच वानरांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतातील कामे सोडून वानराच्या मागेच फिरावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा पांचाळ : कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे सगळीकडेच वानरांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतातील कामे सोडून वानराच्या मागेच फिरावे लागत आहे. शेतामध्ये असलेली पिके कापूस, सोयाबीन, केळी, भाजीपाला व इतर सर्व पिकांची नासधूस करीत आहेत. पिकांना आलेल्या सोयाबीनच शेंगा, कापसाचे घाटरे खाऊन धिंगाणा करीत आहेत.
परिसरात अशा अनेक टोळ्या आहेत. एका टोळीत पन्नास ते साठ वानरे आहेत. दररोज सकाळी शेतात राहत आहेत.
गावातले सर्वच शेतकरी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या वानरांच्या मागेच फिरावे लागत आहे. गावामध्ये अनेकांच्या घरामध्ये घुसून घरातील भाकरी नेत आहेत. त्यामुळे लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरावरील पत्र्यांवर उड्या मारीत असल्याने अनेकांच्या घरावरील लाकडे मोडत आहेत. संबंधित वन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
वानरे पळवताहेत ताटातल्या भाकऱ्या
नांदापूर : परिसरात जवळपास शंभर वानरांचा कळप असून या वानरांनी गावात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गावाजवळील शेतातील पिकांसह घराच्या गच्चीवर वाळत घातलेले धान्य वानरे फस्त करत आहेत. ग्रामस्थ हुसकावण्यास गेल्यावर त्यांच्या अंगावर धावून येत आहेत. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या मागे लागत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थ घरात जेवण असताना घरात घुसून ताटातून भाकरी उचलून नेत आहेत. या वानरांकडे वन विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.