दहा वर्षांपासून रखडला गाळ्यांचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:22 AM2018-03-13T00:22:28+5:302018-03-13T00:22:35+5:30
लाखो रूपये खर्च करून हिंगोली पालिकेतर्फे अडत व्यापाºयांसाठी १६ गाळ्यांचे बांधकाम केले होते. पालिका प्रशासनाकडून रीतसर लिलावाची प्रक्रियाही झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लाखो रूपये खर्च करून हिंगोली पालिकेतर्फे अडत व्यापाºयांसाठी १६ गाळ्यांचे बांधकाम केले होते. पालिका प्रशासनाकडून रीतसर लिलावाची प्रक्रियाही झाली. मात्र हिंगोलीतील काही प्रस्थापित व्यापाºयांनी हा लिलाव हाणून पाडला. अन् २००८ पासून अद्याप या गाळ्यांचा लिलावच झाला नाही.
हिंगोली शहरातील भाजीमंडई येथे ठोक अडत्यांसाठी नगरपालिकेने १६ गाळ्यांचे बांधकाम केले. लाखो रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गाळ्यांचा मात्र अद्याप लिलाव झाला नाही, हे विशेष. पालिकेतर्फे लिलावाची प्रक्रिया केल्याचे सांगितले जाते. मात्र यावेळी काही व्यापारी येऊन वाद घालत लिलाव होऊ देत नसत असे पालिकेने सांगितले. या गाळ्यांचा लिलाव होताना जे पूर्वीचे गाळेधारक व्यापारी होते, ते पण यात सहभागी होत. लाभधारकही यात परत गाळे लिलावात सहभागी झाल्याने यावेळी वाद होऊन हे प्रकरण हाणामारीपर्यंत जायचे. या ताळमेळात मात्र गाळ्यांचा लिलावच लटकला अन् पालिकेचे गाळेही धूळ खात पडून आहेत. परिणामी, या वादामुळे मात्र लाखों रूपयांचा फटका पालिकेला बसला आहे. वेळीच लिलाव झाला असता, तर तोटा झाला नसता. आणि पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली असती. आता हा तोटा पालिकेला कोण भरून देणार असा प्रश्न निर्माण केला जात आहे. हिंगोलीतील भाजीमंडईत पावसाळ्यात तर सर्वत्र चिखल असतो. त्यामुळे व्यापाºयांना अशा स्थितीच भाजीपाला विक्री करावा लागतो.
एप्रिल २०१८ मध्ये या गाळ्यांचा लिलाव होण्याची शक्यता असल्याचे पालिकेने सांगितले.