औंढा येथे धावत्या कारने अचानक पेट घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:18 AM2018-11-26T00:18:27+5:302018-11-26T00:18:53+5:30

येथील उपबाजार समितीच्या समोरून औंढा-हिंगोली रस्त्यावरून २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.

 Aunda car suddenly stuck with a moving car | औंढा येथे धावत्या कारने अचानक पेट घेतला

औंढा येथे धावत्या कारने अचानक पेट घेतला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : येथील उपबाजार समितीच्या समोरून औंढा-हिंगोली रस्त्यावरून २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. ही बाब कारचालक रामेश्वर तोर यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडी रस्त्याया बाजूला उभी केली. कारमधील चौघांना खाली उतरविले. रामप्रसाद तोर हे कुटुंबिय रा. किनवट या कारमध्ये होते. हे सर्वजन त्यांच्या पाहूण्याकडून माजलगाव येथून किनवटला जात होते. कार क्रमांक एमएच-२६व्ही-४४७१ पेट घेतल्या जळाली. त्यात जीपचे मोठे नुकसान झाले.
जीपला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी आरेफलाला अलीम खतीम, तनवीर पठाण, इजीज पठाण, सौफ ईनामदार, प्रमोद देव आदींनी प्रयत्न केले. काही वेळाने पोलीस निरीक्षक कुंदनकुमार घटनास्थळी पोहचले. जळालेली जीप टोकन करून पोलीस ठाण्यात उभी करण्यात आली. आग विझविण्यासाठी झालेले प्रयत्न व चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने जीवीतहाणी झाली नाही. यावेळी परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती.

Web Title:  Aunda car suddenly stuck with a moving car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.