औंढा पं.स.ची सभा ठरली वादळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:18 PM2017-12-26T23:18:11+5:302017-12-26T23:18:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औंढा नागनाथ : येथील पंचायत समितीची सभा वादळी ठरली. शिक्षण विभागाच्या कारभारावर पंचायत समितीच्या सदस्यांनी आसूड ...

Aunda Panchyata was organized in the stormy | औंढा पं.स.ची सभा ठरली वादळी

औंढा पं.स.ची सभा ठरली वादळी

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण गाजले : अधिकारी झाले निरुत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : येथील पंचायत समितीची सभा वादळी ठरली. शिक्षण विभागाच्या कारभारावर पंचायत समितीच्या सदस्यांनी आसूड ओढत प्रौढ वर्गांचा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता. यात चौकशीची मागणी करण्यात आली.
सभापती भीमराव भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीस उपसभापती रामप्रसाद कदम, गटविकास अधिकारी सुधीर ढेंबरे, सहायक गटविकास अधिकारी जगदीश साहू, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश गायकवाड, अभियंता गोविंद चव्हाण, आदींची उपस्थिती होती.
यावेळी पं.स.सदस्य शरद पोले यांनी साक्षर भारत अभियानांतर्गत कुठेच प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालू नसून तरीही प्रेरकांना दरमहा दोन हजार रुपयांचे मानधन दिले जात असल्याचा आरोप केला आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी बगाटे यांनी मात्र मुख्याध्यापकांनी दिलेल्या अहवालानुसारच बिले काढल्याचे सांगितले. रात्रीचे वर्ग चालू आहेत की नाही, याची तपासणी तुम्ही केली का, या प्रश्नावर मात्र ते निरुत्तर झाले होते. त्यानंतर त्यांनी चौकशी करतो, असे सांगून वेळ मारून नेली. त्यानंतर पाणीटंचाईवरही सदस्यांनी आक्रमकपणे बाजू मांडली. हातपंप दुरुस्तीचे वाहन व पथक सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले. मग्रारोहयोची प्रकरणे ज्येष्ठतेनुसार निकाली काढण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.
यावेळी पं.स.सदस्य भीमराव कºहाळे, शरद पोले, ज्ञानोबा गारोळे, नीता गिºहे, निर्मला दळवे, शोभा कºहाळे, सुभद्रा ठोंबरे, संगीता ढेकळे, संजय नागरे, सुधा आकमार, भगवान कदम, सुरेश फुडकर आदी हजर होते.
वगरवाडीवर चर्चा : विद्युतीकरणावर बोट
वगरवाडी येथील डेेंग्यूच्या साथीमुळे तिघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकाराबाबतही या बैठकीत चर्चा झाली. तर प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित अधिकारी-कर्मचारी राहत नाहीत. उपकेंद्र तर अनेकदा बंदच असतात. आरोग्य सेवक व सेविकाही अशा गावांत थांबत नसल्याचे नीता गिºहे यांनी सांगितले. विद्युतीकरणासाठी प्रत्येक शाळेला साडेसात हजार रुपये शासनाकडून मिळाले आहेत. ते किती शाळांना वितरित केले व किती शाळांनी यातून कामे केली, याचे उत्तरही देता आले नाही. तर शापोआ कर्मचाºयांचे मानधन अदा करण्यासही सांगण्यात आले.

Web Title: Aunda Panchyata was organized in the stormy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.