आॅटोचालकाने ‘लॅपटॉप’ केला पोलिसांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:15 AM2018-07-03T00:15:17+5:302018-07-03T00:15:31+5:30
आॅटोतच विसरून राहिलेला प्रवाशाचा लॅपटॉप चालकाने पोलिसांच्या स्वाधीन केला. माणुसकी दाखवत आॅटोचालकाने प्रवाशाची आॅटोत विसरून राहिलेली वस्तू पोलिसांकडे परत केली. त्यामुळे चालकाचे कौतुक होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आॅटोतच विसरून राहिलेला प्रवाशाचा लॅपटॉप चालकाने पोलिसांच्या स्वाधीन केला. माणुसकी दाखवत आॅटोचालकाने प्रवाशाची आॅटोत विसरून राहिलेली वस्तू पोलिसांकडे परत केली. त्यामुळे चालकाचे कौतुक होत आहे.
हिंगोली येथील रेल्वेस्थानक वसाहत येथून २ जुलै रोजी निरंजन चंद्रकांत मीना हा युवक आॅटोने प्रवास करीत होता. परंतु प्रवासादरम्यान युवकाचा लॅपटॉप आॅटोतच विसरला. आॅटोचालक मनोहर तुकाराम हातांगळे रा. निरंजन बाबा चौक हिंगोली यांनी युवकाची बराच वेळ वाट पाहिली. परंतु युवक वस्तू घेण्यासाठी परत आलाच नाही. त्यामुळे आॅटोचालक हातांगळे यांनी सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास थेट हिंगोली शहर ठाणे गाठून विसरलेला लॅपटॉप पोनि उदयसिंग चंदेल यांच्याकडे स्वाधीन केला. काही वेळाने निरंजन मीना हा युवक लॅपटॉप हरविल्याने ठाण्यात आला. यावेळी पोनि उदयसिंग चंदेल व पोलीस कर्मचारी एस. आर. डाखोरे यांनी लॅपटॉप त्या युवकाचाच आहे का याची खात्री करून घेतली. खात्री पटल्यानंतर लॅपटॉप युवकाच्या स्वाधीन केला. वस्तू परत केल्यामुळे हातांगळे यांचे कौतुक होत आहे.