हिंगोली जिल्ह्यात सरासरी ९ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 03:05 PM2020-08-10T15:05:34+5:302020-08-10T15:07:30+5:30
जिल्ह्यात जून ते आजपर्यंत सरासरी ६८.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हिंगोली : जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपूर्वीच्या चोवीस तासांत सरासरी ८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली शहरासह परिसरातील ग्रामीण भागात रात्रीपासून पावसाची भुरभुर सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळीसुद्धा पावसाची रिमझिम सुरूच आहे.
यामध्ये हिंगोली ९.१ मिमी, कळमनुरी ९.१ , वसमत ८.४ मिमी, औंढा १0.२ मिमी, सेनगाव ८ मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे. मंडळनिहाय झालेले पर्जन्यमान हिंगोली १८.८ मिमी, नर्सी ८.८, सिरसम १२, बासंबा १५, खांबाळा ८.५, कळमनुरी ७.३, वाकोडी ९.१, नांदापूर १.८,आगाडा बाळापूर १५, डोंगरकडा २.५, वारंगा फाटा १८.८, वसमत ८, आंबा ११, हयातनगर ८.८, गिरगाव ४.३, हट्टा ४.५, टेंभूर्णी १३.८, कुरुंदा ८.५, औंढा १0.२, येहळेगाव १६.८, साळणा १.३, जवळा बाजार १२.५, सेनगाव १५.८, गोरेगाव ११.८, आजेगाव 0.३, साखरा ३.५ पानकनेरगाव ४.५, हत्ता १२ मिमी नोंद झाली आहे.
आता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील वार्षिक सरासरी म्हणजे ७९५.३ मिमीला अनुसरून पर्जन्याचे प्रमाण काढले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात जून ते आजपर्यंत सरासरी ६८.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात हिंगोली ५८६.८ मिमी (६७.६ टक्के), कळमनुरी ५३४.७ मिमी (६७.२), वसमत ५१२.८ (६२.२), औंढा नागनाथ ७00.६ (९५.२), सेनगाव ४४८.७ (६१.५) अशी पर्जन्याची नोंद झाली आहे.