जिल्ह्यात सरासरी ११.३० मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:39 AM2021-06-16T04:39:16+5:302021-06-16T04:39:16+5:30
हिंगोली जिल्ह्यात १५ जूनच्या सकाळी ६ पूर्वीच्या २४ तासात हिंगोली १३.७० मिमी, कळमनुरी १२.४०, वसमत ११.१०, औंढा १२.९०, सेनगाव ...
हिंगोली जिल्ह्यात १५ जूनच्या सकाळी ६ पूर्वीच्या २४ तासात हिंगोली १३.७० मिमी, कळमनुरी १२.४०, वसमत ११.१०, औंढा १२.९०, सेनगाव ६.६० मिमी एवढी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. मंडळनिहाय हिंगोली १३.८, सिरसम १०.३, बासंबा १५.८, माळहिवरा १८.३, खांबाळा १२.८ मिमी पावसाची नोंद झाली. कळमनुरी तालुक्यात कळमनुरी १५.८, वाकोडी ९.८, नांदापूर १२.४, डोंगरकडा १२.४, वारंगा २४, वसमत ५, आंबा ३.५, हयातनगर ११, गिरगाव १, हट्टा १९.३, टेंभुर्णी ११.५, कुरुंदा २५.३, औंढा २३.५, साळणा १०.३, जवळा १७.८, सेनगाव ३.५, गोरेगाव ३१.३, आजेगाव ४.५, हत्ता ०.३ मिमी, अशी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सगळ्याच तालुक्यामध्ये सरासरी १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हिंगोलीत यंदा कमी पर्जन्य आहे. मात्र इतर तालुक्यात दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत चांगले पर्जन्य झाले आहे. त्यामुळे पेरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.