जिल्ह्यात सरासरी २०.८० मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:20 AM2021-06-29T04:20:30+5:302021-06-29T04:20:30+5:30
हिंगोली जिल्ह्यात काही दिवस पावसाने ओढ दिल्यानंतर दोन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली आहे. यामध्ये कालही जिल्ह्यात विविध भागात पावसाने ...
हिंगोली जिल्ह्यात काही दिवस पावसाने ओढ दिल्यानंतर दोन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली आहे. यामध्ये कालही जिल्ह्यात विविध भागात पावसाने हजेरी लावली. हिंगोली तालुक्यात १९.७० मिमी, कळमनुरी २२.४०, वसमत २४.७०, औंढा २४.७०, सेनगाव १४.७० अशी तालुकानिहाय सरासरी पर्जन्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत तब्बल २४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या २८.२९ टक्के आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात यंदा जास्त पर्जन्य झाल्याचे दिसत आहे. यामध्ये तालुकानिहाय विचार केला तर हिंगोली २५.३८ टक्के, कळमनुरी २८.८० टक्के, वसमत २५.४३ टक्के, औंढा ३५.१३ टक्के, सेनगाव २८.४४ टक्के पर्जन्य झाले आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ८५९ मिमी असून गतवर्षी १०७१ मिमी पर्जन्यमान झाले होते. हे प्रमाण १२४ टक्के होते.