पुरस्कार वितरणाचे नियोजन बारगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:01 AM2018-09-17T00:01:31+5:302018-09-17T00:03:50+5:30

आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिनी’ देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. मात्र नियोजनाअभावी पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलला जातो. यावर्षीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम १७ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहितीही शिक्षण विभागाने दिली. आता त्यातही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आदर्श शिक्षक पुस्कार सोहळा कधी पार पडणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

 The award distribution arrangements have begun | पुरस्कार वितरणाचे नियोजन बारगळले

पुरस्कार वितरणाचे नियोजन बारगळले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिनी’ देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. मात्र नियोजनाअभावी पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलला जातो. यावर्षीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम १७ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहितीही शिक्षण विभागाने दिली. आता त्यातही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आदर्श शिक्षक पुस्कार सोहळा कधी पार पडणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
आदर्श पिढी घडविणाऱ्या, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाºया शिक्षकांचा शिक्षकदिनी ५ सप्टेंबर रोजी सन्मान करून त्यांना आदर्श पुरस्कार वितरित केला जातो. परंतु शिक्षण विभागातर्फे याबाबत वेळेवर नियोजन केले जात नाही. त्यामुळे प्रस्ताव दाखल करण्यास व संचालकांकडे पाठविण्यास विलंब होतो. त्यामुळे शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षकांना मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. केवळ नियोजनाअभावी पुरस्कार वितरण सोहळा वेळेत पार पडत नाही, अशा प्रतिक्रियाही अनेक शिक्षकांनी दिल्या. गतवर्षी एकूण ६ जणांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यावर्षी एकूण १६ जणांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे. परंतु आता निवड समितीची बैठक कधी पार पडेल आणि कधी विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे सदर प्रस्ताव पाठविले जातील हा प्रश्नच आहे. परंतु नियोजनाअभावी मात्र यंदाही पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर गेला आहे. १७ सप्टेंबरनंतर आता पुढची तारीख कोणती काढण्यात येणार? असा प्रश्न शिक्षकांतून उपस्थित केला जात आहे.
हिंगोली : गतवर्षीही नियोजनाचा अभाव
तालुका स्तरावरून संबधित गटशिक्षणाधिकाºयांनी जिल्हा शिक्षण कार्यालयात आतापर्यंत १६ शिक्षकांचे प्रस्ताव दाखल केले आहेत. निवड समितीमार्फत सदर प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे पाठविण्यात येणार होते. परंतु अद्याप समितीची बैठकच पार पडली नाही.
त्यामुळे आता पुढील कार्यक्रम रेंगाळला आहे. पुरस्कार वितरणाबाबत दरवर्षी नियोजन नसते. त्यात बैठकही लवकर होत नाही. परिणामी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडतो. यावर्षीही गतवर्षीचे चित्र आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याबाबत शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले १७ सप्टेंबर रोजी होणार कार्यक्रम पुढे ढकल्यात आला आहे.

Web Title:  The award distribution arrangements have begun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.