राष्ट्रवादी तर्फे कोरोनावर जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:21 AM2021-06-17T04:21:09+5:302021-06-17T04:21:09+5:30

तिसरी लाट लक्षात घेता लहान मुलांच्या आरोग्याकरिता नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी ...

Awareness campaign on Corona by NCP | राष्ट्रवादी तर्फे कोरोनावर जनजागृती अभियान

राष्ट्रवादी तर्फे कोरोनावर जनजागृती अभियान

Next

तिसरी लाट लक्षात घेता लहान मुलांच्या आरोग्याकरिता नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी घ्यावयाची दक्षता, मोफत आरोग्य सल्ला याबाबतही उपाययोजना करण्यात आली आहे. लसीकरणाच्या बाबतीत देखील जनजागृती करण्यात येत असून शहरातील वृद्ध दिव्यांग व्यक्ती, ज्यांना लसीकरण केंद्रापर्यंत जाता येत नाही अशा व्यक्तींकरिता मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी परमेश्वर इंगोले, जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, भाऊराव ठाकरे, केदार ढांगे, अशोक पाटील, कमलेश यादव, संचित गुंडेवार, सूरज वडकुते, इरफान पठाण, शेख शाहबाज, पंकज पैठणे, सोनुने व आदी उपस्थित होते. सर्व नागरिकांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन शहराध्यक्ष जावेद राज यांनी केले आहे.

Web Title: Awareness campaign on Corona by NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.