बाळ वारंवार डायपर ओले करतेय; तातडीने डॉक्टरांना दाखवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:25 AM2021-07-25T04:25:21+5:302021-07-25T04:25:21+5:30
आई-वडिलांना मधुमेह असेल तर ... घरात रक्ताच्या नात्यातील कोणाला डायबिटीज असेल, तर मुलांना मधुमेह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
आई-वडिलांना मधुमेह असेल तर ...
घरात रक्ताच्या नात्यातील कोणाला डायबिटीज असेल, तर मुलांना मधुमेह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बैठे काम, बदलती जीवनशैली यामुळेही आजाराचा धोका संभवतो. तरीही पालकांनी मुलांच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये, तत्काळ डॉक्टरांना दाखविणे कधीही चांगले.
काय आहेत लक्षणे
-तहान, भूक जास्त लागणे
-वारंवार लघवी येणे
-अचानक वजन कमी होणे
-चिडचिडेपणा जास्त जाणवणे
-वारंवार आजारी पडणे, सतत सर्दी होणे
काळजी काय घ्यावी
फास्टफूड, बाहेरचे जेवण टाळावे, अनुवंशिक आजार असल्यास तत्काळ तपासणी करावी, जेवढ्या लवकर निदान कराल तेवढी पुढे गुंतागुंत होणार नाही. ठराविक आहार देऊन व्यायाम करून घ्यावा.
लहान बालकांना फास्टफूड, बाहेरचे जेवणे देणे टाळावे. तसेच बाळ वारंवार लघवी करीत असेल, अचानक वजन कमी होत असेल, तर बालकाला डॉक्टरांना दाखवावे. अनुवंशिकता असल्यास बालकांना हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- डॉ. दीपक मोरे, बालरोग तज्ज्ञ , हिंगाेली
लहान मुलांना टाईप १ डायबिटीज हा आजार शक्यतो होत नाही. मोठ्या मुलांना आजार होऊ शकतो. परंतु, बालकांना काही आजार असेल, वारंवार लघवी करीत असेल, तर डॉक्टरांना दाखवावे. त्यानंतरच निदान होईल.
- डॉ. गोपाल कदम, बालरोग तज्ज्ञ, हिंगोली