नादुरुस्त वीजमीटर मिळणार बदलून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:22 AM2018-04-09T00:22:31+5:302018-04-09T00:22:31+5:30
वीज ग्राहकांना नादुरूस्त मीटरमुळे (फॉल्टी) त्रास सहन करावा लागत आहे. मीटरची वेळेत व अचूक रीडिंग घेतली जात नाही. त्यामुळे असे नादुरूस्त मीटर बदलून देण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत नादुरूस्त वीजमीटर बदलून द्यावेत, असा नुकताच निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वीज ग्राहकांना नादुरूस्त मीटरमुळे (फॉल्टी) त्रास सहन करावा लागत आहे. मीटरची वेळेत व अचूक रीडिंग घेतली जात नाही. त्यामुळे असे नादुरूस्त मीटर बदलून देण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत नादुरूस्त वीजमीटर बदलून द्यावेत, असा नुकताच निर्णय घेण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात महावितरणचे जवळपास १ लाख १० हजार वीज ग्राहक आहेत. मात्र अनेकांच्या वीजमीटरमध्ये बिघाड आहेत, म्हणजेच ते नादुरूस्त आहेत. शिवाय नादुरूस्त मीटर बदलून द्यावेत याबाबत अनेक वीजग्राहकांनी महावितरणकडे अर्जही केली आहेत. सध्या नादुरूस्त वीजमीटची तपासणी महाविरणच्या पथकाकडून केली जात आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात मोहीम राबविली जात आहे. शिवाय नादुरूस्त मीटरची यादीही अधिकाºयांनी मागविली आहे. त्या अनुषंगाने आता विना मोबदला नादुरूस्त मीटर बदलून मिळतील. विशेष म्हणजे मीटर रीडिंग मोबाईल अॅपद्वारे असल्याने बिलिंग प्रणालीत पारदर्शकता आलेली आहे. या कामांमध्ये गतीमानता आली असली तरी मीटर रीडिंग एजन्सीजकडून अद्यापही सदोष मीटर रीडिंग घेण्याचे प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा त्रास सहन करावा लागत असून नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय महावितरणचे सुद्धा आर्थिक नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी व बिलिंगमध्ये अचूकता यावी यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी स्थानिक उपाययोजना कराव्यात अशा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी निर्णय घेतला असून संबंधितांना तशा सूचनाही दिल्या आहेत.
महावितरण : वरिष्ठ अधिकाºयांच्या सूचना
सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत व हे मीटर बदलताना त्याच जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाईल अॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्याचे निर्देश आहेत. विशेष म्हणजे नादुरुस्त असलेले सिंगल फेजचे एकही वीजमीटर ग्राहकाकडे राहणार नाही याप्रमाणे कार्यवाही
करून, यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे मीटर तात्काळ बदलून द्यावेत. अशा वरिष्ठ अधिकाºयांच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाभरात मोहिम राबविली जाणार आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय नादुरूस्त वीजमीटर बदलून दिले जात आहेत. महावितरणच्या अधिकाºयांच्या सूचनेनुसार मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी म्हणाले.