सेनगाव नगराध्यक्षपदी बहिरे तर उपनगराध्यक्षपदी महाजन यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 18:32 IST2018-07-24T18:32:05+5:302018-07-24T18:32:56+5:30
नगरपचांयतचा नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी चे संदीप बहिरे तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचा कुसूम महाजन यांची आज बिनविरोध निवड झाली.

सेनगाव नगराध्यक्षपदी बहिरे तर उपनगराध्यक्षपदी महाजन यांची बिनविरोध निवड
सेनगाव ( हिंगोली ) : येथील नगरपचांयतचा नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी चे संदीप बहिरे तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचा कुसूम महाजन यांची आज बिनविरोध निवड झाली.
नगरपचांयत मध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कालावधी संपल्याने नव्याने नगराध्यक्ष ,उपनगराध्यक्ष निवडी करीता मगळवारी विशेष सभा घेण्यात आली.अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदा साठी राष्ट्रवादी चे नगरसेवक संदीप बहिरे यांचा तर उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा कुसूम महाजन यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र आल्याने हि निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.विशेष सभेला एकुण १७ पैकी १६ नगरसेवक उपस्थित होते.
या निवडी करीता पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची उपस्थिती होती.निवडी बद्दल नगराध्यक्ष बहिरे, उपनगराध्यक्ष महाजन यांचा सत्कार करण्यात आला.या जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष अनिल पंतगे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख, राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष रवींद्र गडदे,शिवसेना तालुका प्रमुख संतोष देवकर, माजी सभापती शंकरराव बोरुडे,माजी नगराध्यक्ष अभिजीत देशमुख, माजी सभापती आप्पासाहेब देशमुख, नगरसेवक कैलास देशमुख, उमेश देशमुख, विलास खाडे,माजी जि.प.सदस्य व्ही.टि.देशमुख,डॉ. साहेबराव तिडके, विष्णू खंदारे, सतिश खाडे,दिपक फटागळे,सुरेश शेळके, दत्ता देशमुख, भारत लोखंडे,बाळु उफाड, निखिल देशमुख, अजय विटकरे, संतोष खाडे ,शिवाजी देशमुख आदी उपस्थित होते.