मराठा आरक्षणासाठी सेनगावात बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:56 PM2018-08-01T12:56:48+5:302018-08-01T12:59:49+5:30
सेनगाव तहसील कार्यालयावर मराठा समाजबांधवांनी आरक्षणासह विविध मागण्यांसाठी बैलगाडी मोर्चा काढला.
हिंगोली : सेनगाव तहसील कार्यालयावर मराठा समाजबांधवांनी आरक्षणासह विविध मागण्यांसाठी बैलगाडी मोर्चा काढला. तसेच तालुक्यात कवठा पाटी, भानखेडा, खैरखेडा, सवना येथेही रास्ता रोको आंदोलन सुरू आहे.
मराठा आरक्षणासाठीआंदोलनांची मालिका सुरूच आहे. आज पुन्हा सेनगाव तालुक्यात आंदोलकांनी उचल खाल्ली आहे. यात सेनगाव येथे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आहे. तर कवठा पाटील, खैरखेडा, सवना येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. हिंगोलीतही मराठा समाज बांधवांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच असून तालुक्यातील कनेरगाव नाका येथे रस्त्यावर टायर जाळून राष्ट्रीय महामार्ग पुन्हा ठप्प केला आहे. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून दोन्हीकडून वाहतूक ठप्प झाली आहे.