बँकेने दिल्या कचराकुंड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:50 PM2017-12-01T23:50:46+5:302017-12-01T23:50:54+5:30
येथे बँक आॅफ इंडियाकडून सीएसआर उपक्रमांतर्गत नगरपालिकेला २ हजार डस्टबिन व सॅनिटरी नॅपकिन्सची एक मशिन देण्यात आली आहे. पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते या मशीनचे उद्घाटन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथे बँक आॅफ इंडियाकडून सीएसआर उपक्रमांतर्गत नगरपालिकेला २ हजार डस्टबिन व सॅनिटरी नॅपकिन्सची एक मशिन देण्यात आली आहे. पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते या मशीनचे उद्घाटन झाले.
हिंगोलीत नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २0१८ ची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर टाकला जाणारा कचरा डस्टबिनमध्येच टाकला जावा व शहर स्वच्छतेसाठी सर्वांचे सहकार्य लाभावे म्हणून काही सामाजिक बांधिलकी जपणाºया संस्थांचीही मदत घेतली आहे. यात बँक आॅफ इंडियाने दोन हजार डस्टबिन दिल्या. यातील हजार ओल्या कचºयासाठी तर हजार सुक्या कचºयासाठी आहेत. इंदिरा गांधी चौक भागात पाच रुपयांचे क्वॉईन टाकून सॅनिटरी नॅपकिनचे मशिनही दिले आहे. त्याच्या उद्घाटनास कांबळे यांच्यासह आ.तान्हाजी मुटकुळे, आ.रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सीओ रामदास पाटील आदी हजर होते. याबद्दल बँक आॅफ इंडियाचे रिजनल मॅनेजर रामबाबू, हिंगोली शहर शाखा व्यवस्थापक सुधीर देशमुख, गंगानगरचे पंढरीनाथ आंधळे यांचा सत्कारही केला.