‘व्याज सवलत’ला बँका उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:24 AM2018-03-13T00:24:08+5:302018-03-13T00:24:21+5:30
डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत यंदा पात्र शेतकºयांचे प्रस्तावच बँकांनी सादर केले नसल्याने मार्च एण्डपर्यंत हे प्रस्ताव न आल्यास नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना फटका बसण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत यंदा पात्र शेतकºयांचे प्रस्तावच बँकांनी सादर केले नसल्याने मार्च एण्डपर्यंत हे प्रस्ताव न आल्यास नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना पीककर्जात दोन टक्क्यांची व्याजाची सवलत दिली जाते. या योजनेत अनेक शेतकरी सहभागी होतात. विशेष म्हणजे थकबाकीदारांप्रमाणेच वेळेत कर्ज फेडणारीही अनेक शेतकरी आहेत. मात्र या योजनेतील पात्र शेतकºयांच्या याद्या विविध बँकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केल्या असता अशा प्रस्तावांत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. या योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी रुपयांची तरतूद मिळाली आहे. तर अतिरिक्त एक कोटी रुपयांची मागणी उपनिबंधक कार्यालयाने करून ठेवली आहे. परंतु परिपूर्ण प्रस्तावच दाखल झालेले नाहीत. १५ मार्चपर्यंत दुरुस्तीसह प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सर्व बँकांना दिल्या आहेत. यात बँका कितपत रस दाखवितात, हा प्रश्नच आहे. हा प्रस्ताव न आल्यास शेतकरी सवलतीपासून वंचित राहू शकतात.
१५ मार्चसाठी तीनच दिवस शिल्लक आहेत. या काळापर्यंत बँकांनी सदर त्रुटी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.