बँकांना कर्जमुक्तीत मिळाले ५८९ कोटी, वाटले ४७३ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:56 AM2021-03-04T04:56:24+5:302021-03-04T04:56:24+5:30
हिंगोली जिल्ह्यात १ लाख ६ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होते. यापैकी जवळपास १.०१ लाख खात्यांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर अपलोड ...
हिंगोली जिल्ह्यात १ लाख ६ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होते. यापैकी जवळपास १.०१ लाख खात्यांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केली आहे. तर ९६ हजार खातेदारांनी आधार संलग्नीकरण करून कर्जमाफीच्या रकमेची पडताळणीही करून घेतली आहे. सध्या ९० हजार खातेदारांच्या खात्यावर ५८९.२५ कोटी रुपये जमा झाले आहेत. २० बँकांचे हे खातेदार आहेत. यापैकी ६२ हजार ३८ शेतकऱ्यांना माफीनंतर कर्जवाटप करण्यात आले आहे. ही रक्कम ४७३.९६ कोटी आहे. तर माफीनंतर ज्यांना पुन्हा कर्ज मिळाले नाही, अशा शेतकऱ्यांची संख्या २८ हजार ४५० एवढी आहे. त्यामुळे बँकांनी पीक कर्ज वाटपाचा दावा केला असला तरीही जवळपास तीस टक्के शेतकरी अजूनही पुन्हा पीक कर्ज मिळण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे याबाबत ओरड होणे साहजिकच आहे. पुढील काळात या शेतकऱ्यांना कर्ज मिळेल, अशी अपेक्षा आहे. कर्जमाफीत सर्वाधिक ४१ हजार २९१ शेतकरी खातेदार स्टेट बँक ऑफ इंडियाचे असून रक्कम ३१० कोटी आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या १५ हजार ४९३ खातेदारांना ११४ कोटी तर परभणी मध्यवर्ती बँकेच्या १२ हजार ९७९ खातेदारांना अवघी २५.५९ कोटींची माफी झाली आहे.
बँकेचे नाव कर्जमुक्तीत मिळालेला लाभ कर्जमुक्तीनंतर पीक कर्ज पीक कर्ज
लाभ मिळालेले शिल्लक
शेतकरीरक्कमशेतकरीरक्कम शेतकरी
अलाहाबाद बँक १३७ १०१.१७ १२९ ९७.५२ ८
आंध्रा बँक१ १.१० ००१
ॲक्सिस बँक १८ १२.८४ १६ १२.५८ २
बँक ऑफ बडोदा २२०८ १६९०.३६ १६३५ १२.९७ ५७३
बँक ऑफ इंडिया २९८० २०९१ २७३५ २६७६.८ २४५
महाराष्ट्र बँक ७८९८ ४५२३.६८ ७४३६ ४४४८.० ४६२
कॅनरा बँक ७४४ ४८७.८४ ४९७ ३९६.७५ २४७
सेंट्रल बँक १३८१ ९२३.२२ ११३४ ७१३.०३ २४७
काॅर्पोरेशन बँक३ २.३० ००३
एचडीएफसी ३९ ३४.८० ३४ ३२.४७ ५
आयसीआयसीआय १०१ १३३.०१ ९१ १३०.४२ १०
आयडीबीआय ८४८ ५६७.२० ४१३ ४५५.७५ ४३५
म. ग्रामीण बँक १५४९३ ११४२०.५ १४७२५ ११०७० ७६८
ओबीसी बँक ४० ४४ ३५ ४२.६७ ५
मध्यवर्ती बँक १२९७९ २५५९.५२ ३८८८ ८१५.१५ ९०९१
पंजाब नॅशनल ८६८ ५३४.२३ ७८३ ४९८.७६ ८५
एसबीआय ४१२९१ ३१०६२.० २५२०५ २३३०६.१ १६०८६
सिंडीकेट बँक ८१२ ६२८.६९ ७२५ ६२२.४८ ८७
युको बँक १९५ १३३.६८ १८१ १२८.९७ १४
युनियन बँक २४५२ १९७४.१ २३७६ १९३५.७ ७६
एकूण ९०४८८ ५८९२५.९ ६२०३८ ४७३९६.६ २८४५०