सावधान ! पेटता फटाका उडून डाेळ्यात गेला, ९ वर्षीय मुलाचा डोळा झाला निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 02:53 PM2021-10-29T14:53:45+5:302021-10-29T14:56:23+5:30

firecracker free Diwali: दूष परिणामापासून वाचण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे ही गरज बनली आहे

Be careful! A 9-year-old boy lost his one eye after a firecracker exploded in his stomach | सावधान ! पेटता फटाका उडून डाेळ्यात गेला, ९ वर्षीय मुलाचा डोळा झाला निकामी

सावधान ! पेटता फटाका उडून डाेळ्यात गेला, ९ वर्षीय मुलाचा डोळा झाला निकामी

googlenewsNext

औंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथील ९ वर्षीय मुलगा फटाके (firecracker free Diwali )फाेडत असताना, अचानक एक फटाका उडून डाेळ्यात गेल्याने त्यांचा डोळा पूर्णपणे निकामी (boy lost his one eye after a firecracker exploded ) झाल्यााची घटना २९ ऑक्टाेबर राेजी घडली आहे. त्यांच्यावर हैदराबाद येथे सध्या उपचार सुरू आहेत.

गाेजेगाव येथील साईनाथ नामदेव घुगे वय ९, हा शुक्रवारी सकाळी फटाके फोडत हाेता. यादरम्यान अचानक एक फटाका उडून डोळ्यात गेल्याने त्यांचा डाेळ्याला गंभीर इजा झाली. त्यास नांदेड येथील दवाखान्यात दाखल केले. परंतु तेथे उपचार झाला नसल्याने त्यास पुढील उपचारासाठी हैदराबाद येथे हलविण्यात आले आहे.

दिवाळी सण अवघ्या तीन दिवसावर असल्याने लहान मुले फटाके खरेदीसाठी आग्रह धरत आहेत. त्यातच आता शाळेला सुट्या लागल्या असून दिवाळीत फटाके फाेडण्याचे नियाेजन आतापासूनच सुरू झाले आहे. मात्र दिवाळीपूर्वीच औंढा नागनाथ तालुक्यातील एका ९ वर्षीय बालकाला डाेळा गमवावा लागता आहे. फटाक्याचे दुष्परिणाम दिसायला सुरूवात झाली आहे. अशा परिणामापासून वाचण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे ही गरज बनली आहे.

Web Title: Be careful! A 9-year-old boy lost his one eye after a firecracker exploded in his stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.