सावधान ! सहप्रवाश्याने एका कॉलसाठी मोबाईल घेतला; दुसऱ्या मिनिटाला १ लाख रुपये काढल्याचा मेसेज आला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 07:58 PM2021-08-17T19:58:24+5:302021-08-17T19:58:53+5:30

एसबीआयच्या बँक खात्यातून एकूण ९९ हजार ५०१ रुपये काढून घेऊन फसवणूक

Be careful! A fellow passenger picked up a mobile for a call; In the second minute, a message came that Rs 1 lakh had been withdrawn | सावधान ! सहप्रवाश्याने एका कॉलसाठी मोबाईल घेतला; दुसऱ्या मिनिटाला १ लाख रुपये काढल्याचा मेसेज आला 

सावधान ! सहप्रवाश्याने एका कॉलसाठी मोबाईल घेतला; दुसऱ्या मिनिटाला १ लाख रुपये काढल्याचा मेसेज आला 

Next

कळमनुरी : एकाच्या मोबाईलवर कॉल करून त्याच्या खात्यातील ९९ हजार ५०१ रुपये काढून घेऊन त्याची फसवणूक केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान कळमनुरी ते वसमत प्रवासादरम्यान घडली आहे.

यातील मोबाईल क्रमांक ९३६९४५५७८८ धारकाने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक ९६८९७१११२१ वर कॉलकरून फिर्यादीच्या खात्यातील सर्व माहिती ॲपमध्ये भरून घेतली. मोबाईलवर आलेल्या संदेशाची माहिती घेऊन, फिर्यादीच्या एसबीआयच्या बँक खात्यातून एकूण ९९ हजार ५०१ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. 

याप्रकरणी श्यामसुंदर काटकर यांच्या फिर्यादीवरून मोबाईल क्रमांक ९३६९४५५७८८ धारकाविरुद्ध येथील कळमनुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनी रणजीत भोईटे हे करीत आहेत.
 

Web Title: Be careful! A fellow passenger picked up a mobile for a call; In the second minute, a message came that Rs 1 lakh had been withdrawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.