टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान; पोटविकार वाढण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:59+5:302021-06-17T04:20:59+5:30
टीव्ही समोर बसून जेवण केल्यास अन्न व्यवस्थितरित्या चावल्या जात नाही. परिणामी ॲसिडीटीला सामोरे जावे लागते. मग ढेकर येणे, ...
टीव्ही समोर बसून जेवण केल्यास अन्न व्यवस्थितरित्या चावल्या जात नाही. परिणामी ॲसिडीटीला सामोरे जावे लागते. मग ढेकर येणे, मळमळ होणे, घाम सुटल्यासारखे होणे, कामातही मन न लागणे आदी समस्यांना सामोरे जावे लागते. काही जण तर दोन्ही वेळेस टीव्ही समोर बसून जेवण करतात. टीव्ही समोर बसल्याशिवाय काहींना जेवणही जात नाही. काही जण टीव्हीवरील जाहिराती देखील पाहण्याचे सोडत नाहीत. प्रत्येक घरांमध्ये टीव्ही समोर बसून जेवण करण्यात महिलांचा मोठा सहभाग आहे. त्यांना कारण विचारल्यास मुलांना टीव्ही लावल्याशिवाय ते जेवणच करत नाहीत, असे त्या सांगतात. तात्पर्य असे की, टीव्ही समोर बसून जेवण केल्यास अनेक व्याधींना सामोरे जाण्याची वेळ येते. परिणामी पोटाचे विकार वाढू लागले आहेत. तेव्हा जे कोणी टीव्हीसममोर बसून जेवण करत असतील त्यांनी टीव्ही बंद करुनच जेवण करावे, असा मोलाचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.