सावधान! कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:27 AM2021-02-20T05:27:10+5:302021-02-20T05:27:10+5:30
१९ रोजी सेनगाव येथे केवळ दोनच जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यात एकही बाधित नाही. तर आरटीपीसीआर चाचणीत १६ ...
१९ रोजी सेनगाव येथे केवळ दोनच जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यात एकही बाधित नाही. तर आरटीपीसीआर चाचणीत १६ बाधित आढळून आले. यात बियाणीनगर २, वाघजाळी १, भटसावंगी २, जिजामातानगर १, गंगानगर १, उमरा २, सावरकरनगर २, सामान्य रुग्णालय १, इडोळी १, आदर्श कॉलनी १, मारवाडी गल्ली २ अशी रुग्णसंख्या आहे. तर चार जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये सेनगाव १, समगा १, साळवा १ तर एक लातूर येथे संदर्भित केला आहे.
आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ३८६४ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३७२९ जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज दिला आहे. तर सध्या ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. आजपर्यंत कोरोनाने ५८ जणांचा मृत्यू झाला आहे.