वाहकास मारहाण; चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:54 PM2018-12-15T23:54:32+5:302018-12-15T23:54:44+5:30
वसमत- औंढा रोडवर बसच्या वाहकास बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी वाहकाच्या तक्रारीवरून चौघांविरोधात शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत/कौठा : वसमत- औंढा रोडवर बसच्या वाहकास बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी वाहकाच्या तक्रारीवरून चौघांविरोधात शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वसमत ते औंढा जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी व वाहकात शाब्दीक चकमक झाली. बाचाबाचीनंतर बस क्र. एमएच २०. ७३१५ ही बोराळा पाटीवर आली असता पुन्हा वादावादी झालेल्या युवकांनी वाहकास बेदम मारहाण केली. मध्यस्थी करणाºया प्रवाशांसही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वाहक राजू गंगाधर खुळखुळे यांच्या तक्रारीवरून पिल्या विलास कदम, अक्षय पूर्ण (नाव माहित नाही) व अन्य दोघे अन्य चौघांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सपोनि बळीराम बंदखडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि कांबळे करत आहेत.
शनिवारी बस वसमत स्थानकात उभी केली असताना जागेच्या कारणावरून प्रथम वाद निर्माण झाला. त्यानंतर बसचालक व वाहकाने उशीर नको म्हणून बस मार्गस्थ केली. त्यानंतर आरोपींनी बसचा पाठलाग करुन बस बोराळा पाटीवर अडविली. आरोपींनी वाहकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत कपडे फाडल्याचे तक्रारदार वाहक खुळखुळे यांनी सांगितले. घटनास्थळी मारहाण झाल्यामुळे बस बराच वेळ बोराळा पाटीवरच उभी होती. या रस्त्याचे सध्या काम सुरू असल्याने एकच बाजूने वाहतूक सुरू आहे. त्यातच बस थांबल्याने काही वेळ वाहतूक ठप्प होती. त्यानंतर घटनास्थळी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि बळीराम बंदखडके व कर्मचाºयांनी भेट दिली. शनिवारी बोराळा येथील मारुती मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यातच ही घटना दुपारी घडल्याने बघ्यांची गर्दी जमली होती.