हिंगोली जिल्ह्यात दुर्र्गाेत्सव आगमनाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:14 AM2018-10-09T00:14:20+5:302018-10-09T00:14:42+5:30

जिल्ह्यात दुर्गाेत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. १० आॅक्टोबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. पूर्वतयारी म्हणून विविध दुर्गादेवी मंडळाची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे.

 Beginning of the Durga Tsev Javan in Hingoli district | हिंगोली जिल्ह्यात दुर्र्गाेत्सव आगमनाची लगबग

हिंगोली जिल्ह्यात दुर्र्गाेत्सव आगमनाची लगबग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात दुर्गाेत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. १० आॅक्टोबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. पूर्वतयारी म्हणून विविध दुर्गादेवी मंडळाची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. दुर्गाेत्सवानिमित्त हिंगोली येथील बाजारात देवीसाठी लागणारे साज श्रृंगार खरेदीसाठी शहरासह ग्रामीण भागातून सोमवारी मोठी गर्दी दिसून आली.
गणेशोत्सवानंतर दुर्गोत्सवाची जिल्ह्यात लगबग सुरू आहे. अवघ्या एका दिवसावर घटस्थापना येऊन ठेपली आहे. दुर्गा मातेच्या आगमनाच्या तयारीसाठी नवरात्रोत्सव मंडळांचीही लगबग सुरू असल्याचे दिसून येते. भक्तीमय वातावरणात दुर्गाेत्सवाचा जागर सलग नऊ दिवस चालतो. पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये गरबा, दांडिया उल्हासात खेळला जातो. तयारीसाठी लागणारी खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारात गर्दी दिसून येत आहे. दुर्गाेत्सवासाठी लागणारे साज श्रृंगार हिंगोली शहरातील बाजारात दाखल झाले आहेत. विविध प्रकारच्या साड्या, घागरा-चोली, मुकुट, गंगावन, शस्त्र, नेकलेस, झुमके, पायल, ओढणी तसेच पूजेसाठी लागणारे फळे, अगरबत्ती, धूप, फुलांचे हार रंगबेरंगी मडकी, देवीचे मुखवटे बाजारात उपलब्ध झाले असून खरेदीसाठीसाठी गर्दी होत आहे. हिंगोली शहरातील जिनकर गल्लीत मागील २५ वर्षांपासून देवीच्या साज-श्रृंगार विक्रेते रविशंकर साहू म्हणाले की, मागील दोन दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातून खरेदीसाठी गर्दी होत आहे. परंतु जीएसटीमुळे साहित्यात दरवाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना दरवाढीबाबत समजून सांगावे लागत आहे. असे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. दांडिया खेळण्यासाठी लागणारा पेहराव खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे. नवरात्रोत्सव जिल्ह्यामध्ये शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास ६०० च्यावर घट स्थापन केले जाणार आहेत. गतवर्षी जिल्ह्यात ६४१ घटस्थापना करण्यात आली होती.
आकाशवाणी कार्यक्रमाने दसरा महोत्सवाची सुरूवात
हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ९ आॅक्टोबर रोजी आकशवाणीच्या कार्यक्रमाने दसरा महोत्सवास प्रारंभ करण्यात येणार आहे. १० आॅक्टोबर रोजी हनुमान यांच्या मूर्तीचे भजनाच्या गजरात मिरवणुक काढण्यात येणार आहे. तसेच प्रदर्शनीचे उदघाटन होणार आहे. दसरा महोत्सवा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. प्रदर्शनीत रोज रात्री ७ ते ११.३० पर्यंत रामलीला आणि नवान्ह पारायणाचा कार्यक्रम होईल. तसेच विविध क्रिडास्पर्धेचे आयोजन दसरा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये कुस्त्यांची भव्य दंगल होणार असून व्हॉलीबॉल, कबड्डी, मॅरॉथॉन, फुटबॉल, लॉन टेनिस, कराटे व बॅडमिंटन आदी क्रिडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात आवश्यकवेळी फेरबदल करण्याचा अधिकार समितीने राखून ठेवला आहे. शिवाय स्पर्धा रद्द करण्याचा अधिकार समितीला असणार आहे.
४हिंगोली येथील सार्वजनिक दसरा महोत्सवात विविध प्रकारची आकर्षक आकश पाळणे, तसेच विविध दुकाने थाटली आहेत. हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा पाहण्यासाठी राज्य-परराज्यातून नागरिक येतात.

Web Title:  Beginning of the Durga Tsev Javan in Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.