बसस्थानकासमोर दोन गटांत राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:05 AM2018-05-20T01:05:13+5:302018-05-20T01:05:13+5:30
शहरातील बसस्थानक परिसरात १९ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन गट समोरा-समोर भिडल्याची घटना घडली. दोन्ही गटांतील तरूणांकडे लोखंडी रॉड व धारदार शस्त्र असल्यामुळे बसस्थानक परिसरातील प्रवासी व नागरिकांची एकच धावपळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील बसस्थानक परिसरात १९ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन गट समोरा-समोर भिडल्याची घटना घडली. दोन्ही गटांतील तरूणांकडे लोखंडी रॉड व धारदार शस्त्र असल्यामुळे बसस्थानक परिसरातील प्रवासी व नागरिकांची एकच धावपळ उडाली.
सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने तसेच शहर ठाण्याचे पोनि अशोक मैराळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि जगदीश भंडारवार, ग्रामीण ठाण्याचे पोनि मारोती थोरात आदी तत्काळ हजर झाले. यावेळी पोलिसांनी दोन्ही गटातील जमावाला पांगविले. घटनेमुळे मात्र काहीवेळ बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी उशिरापर्यंत ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
या घटनेमागचे कारण कळाले नसले तरीही गाडीचा कट मारल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. काल रात्रीही पेन्शनपुरा भागात दोन गटांत हाणामारी झाली होती. सलग दुसऱ्या दिवशी वेगळ्या गटांत अशी घटना घडली.