पाण्याविना रूग्णांचे बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:32 AM2018-11-24T00:32:47+5:302018-11-24T00:33:12+5:30
जिल्हा रुग्णालयात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने रुग्णांसह नातेवाइकांचे बेहाल होत आहेत. पिण्याचे पाणी रूग्णालयाबाहेरून आणावे लागत आहे. त्यामुळे गरिब रूग्णांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. तसेच विविध वार्डमधील स्वच्छतागृहांतही पाणी नसल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असून इतर आजार बळावण्याची शक्यता नाकारत येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा रुग्णालयात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने रुग्णांसह नातेवाइकांचे बेहाल होत आहेत. पिण्याचे पाणी रूग्णालयाबाहेरून आणावे लागत आहे. त्यामुळे गरिब रूग्णांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. तसेच विविध वार्डमधील स्वच्छतागृहांतही पाणी नसल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असून इतर आजार बळावण्याची शक्यता नाकारत येत नाही.
दिवसेंदिवस जिल्हा रूग्णालयातील समस्या वाढतच चालल्या आहेत. कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारीही रूग्णालयातील समस्या व सुविधेकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रूग्णांसह नातेवाईकांची गैरसोय होत आहे. सध्या जिल्हा रूग्णालयात प्रचंड पाण्याचा तुटवडा आहे. परंतु नेहमीचच ही समस्या असल्याने याचे आता गांभीर्य राहिले नाही, अशी अवस्था झाली आहे. जिल्हा रूग्णालयाच्या मध्यभागी एकच वॉटरकूलरची व्यवस्था आहे. रूगालयाच्या वरच्या नवीन इमारतीत स्थलांतरित झालेल्या वार्डांतही पाण्याची बोंब आहे. विशेष म्हणजे रुगालयाच्या बाहेर पाच रूपयाला फिल्टर झालेले पाणी मिळते. त्यामुळे विकतचे पाणी घेतल्याशिवाय पर्याय नाही. या प्रकारामुळे मात्र रूग्ण व नातेवाईकांचे हाल होत आहेत.
जिल्हा रूग्णालय : एकाच वॉटर कूलरवर भिस्त
जिल्हा रूग्णालयात रूग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी केवळ एकच वॉटर कूलर बसविण्यात आले आहे. संपूर्ण रूग्णालयाची भिस्त एकाच वॉटरकुलर आहे. जिल्हा रूग्णालयात शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी दिवसाकाठी २०० च्या जवळपास रूग्ण येतात. त्यामुळे पाण्याविना रूग्ण व नातेवाईकांना भटकंतील करावी लागत असल्याचे चित्र आहे. मागील अनेक वर्षांपासून रूग्णालयातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला नाही. शिवाय रूग्णांच्या नातेवाईकांनी अनेकदा पाण्याच्या समस्येबाबत वरिष्ठांकडे मागणीही केली होती.
जिल्हा रूग्णलयातील सीटीस्कॅन कक्षासमोरील वॉटरकुलरच्या नळाला तोटीच नसल्याचे बुधवारी दिसून आले. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होताना दिसून आला. याकडे मात्र कोणीही लक्ष देत नव्हते, हे विशेष.