कर्जमाफीचे लाभार्थी गेले ६१ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:13 AM2018-05-23T01:13:33+5:302018-05-23T01:13:33+5:30

कर्जमाफीतील विविध निकषात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आता ६१ हजार ४७४ झाली असून २३६ कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तर प्रत्यक्षात ५६ हजार ५९४ शेतक-यांच्या खात्यावर २१६ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 The beneficiary of the loan waiver has gone to 61 thousand | कर्जमाफीचे लाभार्थी गेले ६१ हजारांवर

कर्जमाफीचे लाभार्थी गेले ६१ हजारांवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कर्जमाफीतील विविध निकषात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आता ६१ हजार ४७४ झाली असून २३६ कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तर प्रत्यक्षात ५६ हजार ५९४ शेतकºयांच्या खात्यावर २१६ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दीड लाखांच्या आत कर्ज असलेल्या ४१ हजार २७२ लाभार्थ्यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आली आहेत. तर कर्जमाफीची रक्कम २00.७५ कोटी आहे. मात्र यापैकी ३८ हजार ८६६ लाभार्थ्यांच्या खात्यावर १९२.७२ कोटी जमा झाले. याशिवाय दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले व उर्वरित कर्ज भरून कर्जमाफीचा लाभ घेण्यास इच्छुक १९८३ खातेदार आहेत. अशा शेतकºयांना १२.९१ कोटी रुपयांचा लाभ मिळू शकतो. मात्र यापैकी १४२ खातेदारांनीच उर्वरित रक्कम भरल्याने त्यांना १.६६ कोटींचा लाभ मिळाला आहे.
तर जे नियमित खातेदार आहेत, अशांनाही प्रोत्साहन म्हणून कमाल २५ हजार तर किमान १५ हजार रुपयांपर्यंत लाभ देण्यात येणार होता. यासाठी ग्रीन लिस्टमध्ये १८ हजार २१९ जण होते. त्यांना २२.६३ कोटींचा लाभ मिळणे अपेक्षित होते. मात्र यापैकी १७ हजार ५८६ खातेदारांच्या खात्यावर २१.६८ कोटी रुपये जमा झाले आहेत.
याशिवाय आणखी काही नावे तालुका समितीकडून शिफारसीसाठी पाठविली जाण्याची शक्यता आहे. या याद्या अंतिम झाल्यानंतर कर्जमाफीचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. मात्र तत्पूर्वी रेडलिस्ट तपासणी होईल. या रेडलिस्टमधील तपासलेली नावे पुन्हा तालुकास्तरीय पडताळणी समितीकडे पाठवून ग्रीनलिस्टमध्ये येणे शक्य आहे काय, याची चाचपणी केली जाणार आहे. ते ही यादी आॅडिटरकडून तपासून घेतील. त्यानंतर ते पुन्हा तालुका समितीकडे पाठविणार आहेत. २४ मे रोजी रेड लिस्ट तपासणीबाबत कार्यशाळा होणार आहे. यात नेमकी कशी तपासणी करायची, याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

Web Title:  The beneficiary of the loan waiver has gone to 61 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.