वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी बचाव’ हरली; मुलींचा जन्मदर घटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:33 AM2021-09-23T04:33:07+5:302021-09-23T04:33:07+5:30

हिंगोली : ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यासारख्या अनेक मोहिमा केंद्र व राज्य शासन राबवत आहे. परंतु, वंशाच्या ...

‘Beti Bachao’ lost before the lamp of descent; Birth rate of girls dropped! | वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी बचाव’ हरली; मुलींचा जन्मदर घटला !

वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी बचाव’ हरली; मुलींचा जन्मदर घटला !

Next

हिंगोली : ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यासारख्या अनेक मोहिमा केंद्र व राज्य शासन राबवत आहे. परंतु, वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी बचाव’ हरल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत मुलींचा जन्मदर घटल्याचे पाहायला मिळत आहे.

खरे पाहिले तर मुलगी जन्माला आली तर सासर आणि माहेर ही दोन्ही घरे मुलगी व्यवस्थितरित्या सांभाळते. आईची माया देण्यात ती कुठेही कसर पडू देत नाही. सुख-दु:खात मुलगी वेळोवेळी साथ देते. मग मुलींची संख्या का घटली आहे? हे कळायला अजूनही मार्ग नाही. मुलींचा सांभाळ करा, असे आवाहनही आरोग्य विभागाने वारंवार केले आहे.

मुला-मुलींच्या जन्माची संख्या

२०१७-१८ १८, ४९३

२०१८-१९ १६, ८३२

२०१९-२० १६, ३१७

२०२०-२१ १५, ४९९

२०२१-२२ ऑगस्टपर्यंत ६,६३९

हजार मुलांमागे मुली किती?

२०१७ -१८, ९२४

२०१८-१९, ९००

२०१९-२०, ९४८

२०१२०-२१, ९०४

२०२१-२२ (ऑगस्टपर्यंत ) ९१९

जिल्ह्यात लिंग निदानाला बंदी घालण्यात आली आहे. जन्मापूर्वी लिंगनिदान चाचणी केल्याचे आढळून आल्यास कायद्याने गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. मुलीचा सांभाळ करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मुलगी दोन घरांचा व्यवस्थितरित्या सांभाळ करते. वंशाच्या दिव्यासाठी मुलीची संख्या घटू देऊ नका, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

लिंगनिदान करण्यास जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. सर्व दवाखान्यांना याबाबत वेळोवेळी सूचनाही केलेल्या आहेत. एवढेच नाही तर जिल्ह्यातील प्रत्येक दवाखान्याची वेळोवेळी तपासणी करुन असा काही प्रकार आढळून आल्यास वेळीच तातडीने कारवाई केली जाते.

- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: ‘Beti Bachao’ lost before the lamp of descent; Birth rate of girls dropped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.