सावधान, कमी झोपेमुळे प्रतिकारशक्तीही खालावते !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:33 AM2021-08-28T04:33:08+5:302021-08-28T04:33:08+5:30
हल्ली काही दिवसांपासून मोबाइल, टीव्ही पाहण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे. यामुळे झोप काही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे प्रतिकार शक्ती ...
हल्ली काही दिवसांपासून मोबाइल, टीव्ही पाहण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे. यामुळे झोप काही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे प्रतिकार शक्ती खालावते. प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी झोप घेणे आवश्यक आहे.
अपुऱ्या झोपेचे तोटे
अपुऱ्या झोपेमुळे हृदयावर ताण पडतो. अशावेळी हृदयविकाराचा धोका संभावतो.
दुसरीकडे अपुऱ्या झोेपेमुळे मेंदूवर ताण पडून प्रकृती अधिकच ढासळून जाते.
झोप जर व्यवस्थित झाली नाही तर मनोविकारही वाढतो. रक्तदाब वाढतो तसेच साखरेचे प्रमाणही वाढते.
किमान आठ तास झोप आवश्यक
माणसाला किमान आठ तास झोप असणे आवश्यक आहे. लवकर जेवण करून लवकर झोपल्यास अन्न पचन व्यवस्थितरीत्या होते. रात्री-बेरात्री जेवण केल्यास आणि उशिरा झोपल्यास अन्न पचन होत नाही. त्यामुळे करपट ढेकर येतात. यामुळे तब्येतही बिघडते.
रोगप्रतिकारकशक्ती आपल्या शरीराची ढाल
रोग प्रतिकारशक्ती ही आपल्या शरीराची ढाल आहे. तेव्हा प्रत्येकाने किमान आठ तास तरी झोप घ्यावी. झोप जर व्यवस्थित झाली नाही तर करपट ढेकर येतात, अजीर्ण होते. मग अशावेळी दवाखान्यात जाण्याची वेळ येते. तेव्हा प्रत्येकाने संतुलित आणि सकस आहार घेऊन भरपूर प्रमाणात झोप घ्यावी, असेही हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले.
संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मनुष्याला भरपूर झोप घेणे आवश्यक आहे. याच बरोबर सकाळी लवकर उठून व्यायाम करणेही तितकेच गरजेचे आहे. अर्धा किलोमीटर रोज पायी चालल्यास ते अधिक चांगले राहते.
आरोग्याकडे लक्ष द्या
झोप जर व्यवस्थित झाली नाही तर चिडचिडपणा वाढतो. अभ्यास असो किंवा कार्यालयीन काम असो. त्यात व्यवस्थित लक्ष लागत नाही. कुठेतरी चुकल्यासारखे होते. मन विचलित होऊन बसते. मोबाइल व संगणकावर काम करत असाल तर ते जास्त वेळ करू नये.
-डाॅ. यशवंत पवार, हृदयरोगतज्ज्ञ