पावसाळ्यात सापांपासून सावधान ; जिल्ह्यात विषारी सापांच्या पाच प्रजाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:39 AM2021-06-16T04:39:40+5:302021-06-16T04:39:40+5:30
हिंगोली : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बेडूक, उंदीर आदींना भक्ष करण्यासाठी साप बाहेर येतात. सर्वच साप विषारी नसतात. साप दिसल्यास त्यास ...
हिंगोली : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बेडूक, उंदीर आदींना भक्ष करण्यासाठी साप बाहेर येतात. सर्वच साप विषारी नसतात. साप दिसल्यास त्यास मारु नये, डिवचू नये. तातडीने सर्पमित्रांना म्हणजे सापांना जंगलात नेवून सोडता येईल, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
प्रतिक्रिया सर्पमित्र बॉक्स
घरात, अंगणात व इतर मोकळ्या जागी साप दिसून आल्यास त्यास मारु नये, त्यास डिवचू नये. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तो साप चावा घेतो. अशावेळी कित्येक जण सापांना मारतात. सर्वच साप विषारी नसतात. साप दिल्यास सर्पमित्रांची मदत घ्यावी म्हणजे सापांचा जीव वाचेल. सर्पमित्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलतात नंतर साप जंगलात नेवून सोडतात.
अनेक जण साप दिल्यास त्यास मारतात. अशावेळी नागरिकांनी सापांना मारु नये. साप दिसल्यास सर्पमित्रांची मदत घ्यावी. सर्पमित्रांची मदत घेतल्यास सापांचा जीव वाचू शकेल.
- मुरलीधर कल्याणकर, सर्पमित्र
साप चावल्यास अघोरी उपाय करु नये. मांत्रिकांकडे जावून औषधोपचार घेऊ नये. ज्या ठिकाणी साप चावला आहे. त्या भागावर काहीही दाब देवू नये. तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जावून डॉक्टरांकडून औषधोपचार घ्यावा.
- डॉ. नारायण भालेराव, हिंगोली.