बेरोजगारांनो सावधान... ! डमी वेबसाइटद्वारे घातला जाऊ शकतो गंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:34 AM2021-07-14T04:34:48+5:302021-07-14T04:34:48+5:30

हिंगोली : नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना फसविण्याचे वेगवेगळे फंडे शोधून त्यांची लूट करण्याचे प्रकार समोर येत आहेत. आता बनावट ...

Beware of the unemployed ...! Dummy can be inserted through the website Ganda! | बेरोजगारांनो सावधान... ! डमी वेबसाइटद्वारे घातला जाऊ शकतो गंडा!

बेरोजगारांनो सावधान... ! डमी वेबसाइटद्वारे घातला जाऊ शकतो गंडा!

Next

हिंगोली : नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना फसविण्याचे वेगवेगळे फंडे शोधून त्यांची लूट करण्याचे प्रकार समोर येत आहेत. आता बनावट वेबसाइटच्या माध्यमातून बेरोजगारांना फसविले जात असल्याचे समोर आले आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना हेरून त्यांना नोकरीचे आमिष दाखवून फसविणारी टोळी सक्रिय झाली आहे. फेसबुकवरील एखाद्याच्या प्रोफाइलवरील मित्रांना बनावट अकाउंटच्या माध्यमातून पैशाची मागणी करणे, व्हॉट्सॲप काॅलच्या माध्यमतातून अनेकांना ब्लॅकमेल करणे आदी प्रकार सर्रास घडत आहेत. आता तर बनावट वेबसाइटच्या माध्यमातून नामांकित कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणांच्या हाती बनावट ऑफर लेटर दिले जात आहे. जिल्ह्यातही फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी क्वचितच युवक येतात. खरे तर प्रथम कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खातरजमा करा. प्रत्येक मोठी कंपनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर रिक्त जागांची जाहिरात दाखवते. तसेच मोठी कंपनी कधीही सिक्युरिटी डिपॉझिटच्या स्वरूपात पैशाची मागणी करीत नाही. त्यामुळे अशा ठगांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

अशीही झाली फसवणूक

प्रकरण १

वसमत येथील एका बेरोजगार युवकाला उत्तरप्रदेश येथील एकाने रेल्वेत नोकरी लावतो म्हणून आमिष दाखविले. त्यानंतर बनावट नियुक्तीपत्र देऊन पैशांची टप्प्याटप्प्याने मागणी केली. १० लाख रुपये उकळण्यात आले. शेवटी तीन वर्षांनंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

प्रकरण २

मुंबई (वरळी) येथील नऊ जणांनी इंडिझेल माय इको एनर्जी प्रा.लि. नावाने कंपनीची नोंदणी केली होती. कंपनीच्या बायोडिझेलच्या विक्रीसाठी पेट्रोल पंपाची डीलरशिप द्यायची म्हणून बनावट जाहिरात दिली होती. याच जाहिरातीच्या आमिषाला कुरुंदा येथील एक बळी पडला. त्याला १५ लाख रुपयांचा फटका बसला आहे.

प्रकरण ३

हिंगोली शहरातील एका मल्टिस्टेट बँकेत गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांना जास्तीचे व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकारही जिल्ह्यात दाखल झाला आहे. यातील एका आरोपीच्या मुसक्याही पोलिसांनी आवळल्या होत्या. यात अनेक ठेवीदारांची फसवणूक झाली होती.

अशी करा खातरजमा

१) बनावट वेबसाइटच्या माध्यमातून शासकीय नोकरीची जाहिरात निघाल्याचे भासविले जाते. ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनही केले जाते. मात्र, अशा जाहिरातींची खात्री करूनच ऑनलाइन अर्ज भरणे महत्त्वाचे आहे.

२) सरकारी नोकरीसंदर्भात वेबसाइट असल्यास वेबसाइटच्या शेवटी जीओव्ही डॉट इन किंवा डॉट एनआयसी असे असते. शिवाय कोणताही विभाग थेट नोकरी देत नसतो.

३) त्यासाठी परीक्षा, मुलाखतही घेतली जाते. त्यामुळे बेरोजगार युवकांनी थेट नोकरी मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

नोकरीच्या नावाखाली झालेली फसवणूक

२०१९ - १

२०२० - १

२०२१ - १

शासकीय अथवा निमशासकीय नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना अगोदर जाहिरातीसंदर्भात खात्री करून घ्यावी. तसेच कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये.

- उदय खंडेराय, पोनि. स्थागुशा तथा सायबर सेल प्रमुख

Web Title: Beware of the unemployed ...! Dummy can be inserted through the website Ganda!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.