मराठा आरक्षणासाठी खासदार सातव यांच्या घरासमोर भजन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 06:40 PM2018-08-03T18:40:12+5:302018-08-03T18:42:51+5:30
कळमनुरी येथे खा. राजीव सातव यांच्या घरासमोर मराठा शिवसैनिक सेनेने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भजन आंदोलन केले.
हिंगोली : कळमनुरी येथे खा. राजीव सातव यांच्या घरासमोर मराठा शिवसैनिक सेनेने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भजन आंदोलन केले. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मोर्चे आंदोलने सुरूच राहतील असे आंदोलकांनी यावेळी जाहीर केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जेव्हा मोर्चा आंदोलने सुरू होतात तेव्हाच खासदार-आमदार यांना जाग येते. त्यांनी कायम या मुद्द्यावर आवाज उठवावा अशी मागणी करत आंदोलकांनी तब्बल दीड तास भजन आंदोलन केले. आमदार खासदार यांनी आरक्षणाच्या आंदोलनात सातत्य ठेवावे यासाठी आम्ही भजन आंदोलन केले असे मराठा शिवसैनिक सेनेचे विनायक भिसे यांनी यावेळी सांगितले.
मुंडण करून केला निषेध
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली शहरातील गांधीचौक येथे मागील पाच दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज येथे आंदोलकांनी मुंडन करून मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.