भरधाव कार पुलावरून कोसळली नदीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:31 AM2021-01-25T04:31:11+5:302021-01-25T04:31:11+5:30
औंढा नागना थः औरंगाबाद येथून नांदेड येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी कार घेऊन निघालेल्या कारचा समोरील टायर नदीच्या पुलाजवळ फुटल्याने गाडीवरील ...
औंढा नागना थः औरंगाबाद येथून नांदेड येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी कार घेऊन निघालेल्या कारचा समोरील टायर नदीच्या पुलाजवळ फुटल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने कार पुलावरून नदीत कोसळल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये एक जण ठार तर चार जण गंभीर झाले आहेत.
औरंगाबादवरून नांदेडकडे २४ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास जात असताना औंढा राष्ट्रीय महामार्गावरील धार माथा गावाजवळ असलेल्या पूर्णा नदी पुलावरून कार एमएच २० सीएच ७५८९ भरधाव वेगाने जात हाेती. कारच्या डाव्या बाजूच्या समाेरील टायर फुटल्यामुळे चालकाचे कारवरील नियत्रंण सुटले. यामुळे गाडी पूर्णा नदीत कोसळली. यामध्ये एका महिलेसह चार जण जखमी झाले. जखमींमध्ये रविकांत तरटे वय ६१, पूजा तरटे वय ५५, कमलाकर नागोरे वय ५०, चालक सारंग काळे वय ४५ हे चार जण जखमी झाले. हे सर्व जण रामनगर, औरंगाबाद येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
या घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजेनाथ मुंडे, जमादार अफसर पठाण, अमोल चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान चालक सारंग काळे यांचा मृत्य झाला आहे.
फाेटाे नं.२४ एचएनएलपी ०२ (धार माथा गावाजवळील पूर्णा नदीत कार पडल्याचे चित्र. )