भारिपतर्फे जिल्हाभरात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:19 AM2018-04-04T00:19:45+5:302018-04-04T00:19:45+5:30
भीमा कोरेगाव दंगलीस कारणीभूत संभाजी भिडे यांना अटक करा यासह विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघातर्फे ३ एप्रिल रोजी जिल्हाभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : भीमा कोरेगाव दंगलीस कारणीभूत संभाजी भिडे यांना अटक करा यासह विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघातर्फे ३ एप्रिल रोजी जिल्हाभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले.
हिंगोली येथील तहसील कार्यालयासमोर भारिपच्या वतीने घंटानाद आंदोलन करून भीमा कोरेगाव दंगलीस कारणीभूत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष रवींद्र वाढे, ज्योतीपाल रणवीर, प्रा. सुनीता केदारे, अशोक खंदारे, अशोक कांबळे, बबन भुक्तर, दीपक धांडे, रत्नाकर कांबळे, सिद्धार्थ वाघमारे शिवाजी इंगोले आदींच्या सह्या आहेत. पाचही तालुक्यात घंटानाद आंदोलन केले.
वसमत : येथे भारिपच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात मंगळवारी घंटानाद धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आले. निवेदनावर रमेश भुजबळ, प्रभावती खंदारे, प्रकाश गव्हाणे, नरेश कोकरे, उत्तम करवंदे, मुकुंद करवंदे, साहेबराव सदावर्ते, भगवान जाधव, अंबादास सरोदे, भीमराव सरोदे व पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.
कळमनुरी येथे तीन तास घंटानाद आंदोलन
४कळमनुरी: येथील तहसील कार्यालयासमोर ३ एप्रिल रोजी भारिप तर्फे तीन तास घंटानाद आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांना देण्यात आले. यावेळी सुनील पाईकराव, एस.के. इंगोले, मुगाजी आवटे, सुरेश तेलगोटे, किरण पाईकराव, गौतम दांडेकर, मारोतराव गायकवाड, दिलीप डोंगरे, दिलीप पाटील, विलास कांबळे, तातेराव दांडेकर, शंकर रणवीर, सुनंदाबाई वाघमारे, बायनाबाई शिंदे, दशरथ पाईकराव, काशीनाथ साळवे आदींची उपस्थिती होती.