कयाधू नदीवरील बंधा-यांचे उत्साहात भूमीपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:38 AM2017-11-20T00:38:43+5:302017-11-20T00:38:53+5:30
नागा सिनगी, घोटा देवी येथील कयाधू नदीवरील बंधा-यांचे भूमिपूजन १९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील नागा सिनगी, घोटा देवी येथील कयाधू नदीवरील बंधा-यांचे भूमिपूजन १९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते झाले.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, सेनगावचे नगराध्यक्ष अभिजित देशमुख, हिंगोली नगराध्यक्ष बाबाराव बांगर, गजानन घुगे, गणेश बांगर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाशा पटेल म्हणाले ‘ग्लोबल वॉर्मिंग’ मुळे पावसाचे ऋतूचक्र बदलले आहेत. त्यामुळे पावसाचे पडणारे जास्तीत जास्त पाणी आडवून जमिनीत जिरविणे हि काळाची गरज बनली आहे. जिल्ह्याच्या अनुशेषातंर्गत कयाधू नदीवरील बंधा-याची मालिका तयार होणार आहे. बंधा-यामुळे सिंचन क्षेत्र वाढणार असून बंधा-यांचा शेतक-यांना फायदा होणार आहे. जिल्ह्यात १५ हजार हेक्टर अनुशेष भरून काढण्यासाठी कायधू नदीवर ५ बंधारे मंजूर झाले आहेत. तर शेती मालालचाही भाव वाढणार आहे.