सार्वजनिक ठिकाणी खुशाल ओढा बिडी-सिगारेट; दंडच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:28 AM2020-12-31T04:28:57+5:302020-12-31T04:28:57+5:30
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे. अशी व्यक्ती आढळल्यास त्याला दंड करण्याचा अधिकार अन्न व औषधी प्रशासनाला होता. ...
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे. अशी व्यक्ती आढळल्यास त्याला दंड करण्याचा अधिकार अन्न व औषधी प्रशासनाला होता. नंतर यात बदल करुन शाळा मुख्याध्यापक, कार्यालयप्रमुख, आरोग्य, पोलीस अशा जवळपास १७ ते १८ विभागांना दंड आकारण्याचे अधिकार दिले. मात्र, इतर विभागही यात कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे यंदा एकही कारवाई नाही
अन्न व औषधी प्रशासनाकडूनच सर्वसाधारणपणे या प्रकरणांत कारवाई होते. मात्र, यंदा त्यांनीही कोरोनामुळे हिंगोली जिल्ह्यात एकही कारवाई केली नाही. त्यामुळे यात कुणालाही दंड झाला नाही. त्याचा परिणाम म्हणून हिंगोलीत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांना रान मोकळे असून, कोणतीही भिडभाड न ठेवता धूम्रपान होते.
‘अन्न, औषध’ला
दंडाचे अधिकार प्राप्त
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यावर दंड आकारण्याचे अधिकार सुरुवातीला फक्त अन्न व औषधी प्रशासनालाच होते. नंतर त्यात आरोग्य, पोलीस, सर्व कार्यालयप्रमुख अशा जवळपास १८ विभागांना हे दंड आकारण्याचे अधिकार देण्यात आले होते. मात्र, इतर विभाग यात फारसे काहीच करीत नाहीत.
बिडी-सिगारेट
ओढण्याचे धोके
बिडी आणि सिगारेट ओढण्याचे धोके मोठ्या प्रमाणात आहेत. फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असताे. त्यातच ब्रेन हॅमरेजसारखा धोकाही आहे. लठ्ठपणाही येऊ शकतो. तर तंबाखू, गुटखा यामुळेही कर्करोगाचा धोका आहे. शिवाय या दोन्हींतही हृदयरोगाचा धोकाही आहे.