पंचकल्याणक महोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:58 AM2018-04-10T00:58:32+5:302018-04-10T10:45:18+5:30
येथे श्री १00८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर जिजामातानगर यांच्या वतीने रामाकृष्ण नगरात सुरू असलेल्या जैन समाजाच्या पंचकल्याणक महोत्सवात आज आरतीच्या कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथे श्री १00८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर जिजामातानगर यांच्या वतीने रामाकृष्ण नगरात सुरू असलेल्या जैन समाजाच्या पंचकल्याणक महोत्सवात आज आरतीच्या कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी होती.
मुनीश्री अक्षयसागर महाराज, नेमिसागर महाराज, समताभूषण महाराज यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या महोत्सवात विविध कार्यक्रम होत आहेत. ९ एप्रिल रोजी सकाळी महाराजांचे प्रवचन झाले. त्यानंतर राज्याभिषेक, राजतिलक, मंडलेश्वर राजा द्वारा भेट समर्पण, सेनापती नियुक्ती, षटक्रिया, दंडनीती, वर्णव्यवस्था, राजधर्मावर उपदेश आदींसह शास्त्र प्रवचन, संगीतमय आरती, नाटिका आदी कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत घेण्यात आले. या कार्यक्रमांना परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती असल्याचे पहायला मिळाले.