वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, आराटी शिवारातील घटना

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: April 15, 2023 06:34 PM2023-04-15T18:34:19+5:302023-04-15T18:34:43+5:30

कळमनुरी तालुक्यातील आराटी पाटी जवळील पेट्रोल पंपाजवळ झाला अपघात

Bike rider dies in collision with vehicle, incident in Arati Shivara | वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, आराटी शिवारातील घटना

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, आराटी शिवारातील घटना

googlenewsNext

हिंगोली : अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीचालकाचा ( MH38 R 6027) मृत्यू झाला. ही घटना कळमनुरी तालुक्यातील आराटी शिवारात १५ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाणे व महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. 

प्रवीण ग्यानबाराव पाईकराव (वय २८ रा. साळवा ता. कळमनुरी) असे वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. कळमनुरी तालुक्यातील आराटी पाटी जवळील पेट्रोल पंपाजवळ अपघात झाल्याची माहिती येलकी येथील महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या पथकास मिळाली होती. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक शेख,सहायक पोलिस उपनिरीक्षक शैलेश मुदिराज,पोलिस अंमलदार लक्ष्मीकांत माखणे,  तय्यब, युवराज कांबळे,गजानन ढाले, दिनकर बांगर ,रवि बांगर,हातभार, चालक जोगदंड यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अपघातग्रस्त दुचाकी महामार्गाच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, कळमनुरी ठाण्याचे जमादार संजय राठोड, अरविंद राठोड, गुलाब जाधव  घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह कळमनुरी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केला. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रीया सुरू होती.

Web Title: Bike rider dies in collision with vehicle, incident in Arati Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.